नागपूर

Nagpur : पार्टी देण्याच्या बहाण्याने शिक्षकाने अल्पवयीन मुलीला नेले 'ओयो'वर; ऑटोचालकांना संशय आल्याने...

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : सहलीमध्ये दिलेला टास्क पूर्ण केल्याने पार्टी देण्यासाठी गणिताच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीचे अपहरण करीत विनयभंग केला. ही बाब परिसरातील ऑटोचालकांच्या निदर्शनास येताच त्यांनी शिक्षकाला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी अपहरण, विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली. ही घटना शनिवारी (ता.२४) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास यशोधरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

अजयकुमार गंगाराम प्रसाद (वय ३२, रा. छावनी, सदर) असे अटकेतील शिक्षकाचे नाव आहे. पीडित मुलगी बारावीत शिकते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हा सदरमधील तपस्या ट्युशन क्लासेसमध्ये शिकवणीवर्ग घेतो. शनिवारी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास शिवकणी वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनी पिकनिकसाठी वाकी जवळ असलेल्या द्वारका येथील वॉटर पार्कमध्ये गेले.

अजयकुमारही त्यांच्यासोबत होता. त्याने विद्यार्थ्यांना टास्क दिले. जो हे टास्क पूर्ण करेल त्याला पार्टी देईल असेही त्याने यावेळी म्हटले. यावेळी पीडित विद्यार्थिनीने ते पूर्ण केले. दुपारी सर्व नागपुरात परतले. त्यानुसार पार्टीच्या बहाण्याने अजयकुमार याने पीडित मुलीला बोलावून घेतले. पीडित मुलीला घेऊन त्याने कपिलनगर परिसरात जेवन केले.

यानंतर त्याने मोटारसायकलने तिला यशोधरानगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ममता मॉलजवळ नेले. मुलीला मोटारसायकलजवळ थांबवून अजयकुमार हा ओयो हॉटेलमध्ये गेला. मुलगी मोटारसायकजवळ एकटी उभी दिसल्याने परिसरातील ऑटोचालकांना संशय आला. नागरिकांनी तिला विचारणा केली. तिने घडलेला प्रकार सांगितले.

अजयकुमार हा बाहेर येताच त्यांनी अजयला पकडून चोप देत यशोधरानगर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अजयकुमारला अटक केली. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीअंतर्गत कारागृहात रवानगी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT