teachers transferred will online in nagpur zp 
नागपूर

शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या, 'या' आहेत अटी अन् पात्रता

नीलेश डोये

नागपूर : जिल्हा परिषद शिक्षकांच्या ३१ मे पर्यंत ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्याबाबतचे ग्रामविकास विभागाने आदेश काढले. शिक्षकांच्या बदलीबाबत यापूर्वीचा आदेश वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे या शासन निर्णयात बदल करण्याची मागणी शिक्षक संघटना कडून सातत्याने करण्यात आली होती. त्यामुळे शासनाकडून जि.प. पुणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचे अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. 

शासन निर्णयातील तरतुदीमध्ये बऱ्याच सुधारणा करून नवीन निर्णय तयार केला. नवीन निर्णय व मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षांची सेवा व एका शाळेत ५ वर्षांची सेवा पूर्ण करणारे तसेच अवघड क्षेत्रात ३ वर्ष सेवा पूर्ण करणारे शिक्षक बदलीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे २०१८ च्या तुलनेत बऱ्याच कमी प्रमाणात बदल्या होणार असल्याचे सांगण्यात येते. कर्मचाऱ्याच्या जोडीदारास गंभीर आजार असल्यास अशा कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. अवघड गावांची निश्चिती करण्याकरिता एकूण सात निकष दिले असून त्यापैकी तीन निकषाची पूर्तता करणाऱ्या गावाचीच अवघड क्षेत्रातील गाव म्हणून निश्चिती होणार आहे. 

खोटी माहिती देणाऱ्यांचे निलंबन -
खोटी माहिती सादर करून संवर्ग १ व संवर्ग २ मध्ये बदलीचा लाभ घेतल्यास, अशा शिक्षकांना निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. 

वर्ष २०१८ च्या बदलतील रँडम व विस्थापित शिक्षकांकरिता सेवाज्येष्ठतेची अट न ठेवता त्यांना संवर्ग १ मध्ये बदलीची संधी द्यावी. बदली करिता सेवाज्येष्ठता पात्रता तारीख ३० जून गृहीत धरण्यात यावी. तसेच अवघड गावांची निवड करण्याबाबतचे निकष शिथिल करण्यात यावे. 
-लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT