A team of forest department has arrested the hunter of wild animal Nilgai
A team of forest department has arrested the hunter of wild animal Nilgai 
नागपूर

नीलगायीची शिकार करणाऱ्यास वनविभागाकडून अटक

सकाळ डिजिटल टीम

टाकळघाट (नागपूर ) : वन्यप्राणी नीलगायीची शिकार करणाऱ्यास वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. ही घटना गोसावीनगर येथे घडली असून अटकेतील आरोपीचे नाव दशरथसिंग निहालसिंग जुन्नी असे आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला गुप्त माहिती मिळाली की, आरोपी जून्नी याच्या घरी नीलगाय मृतावस्थेत पडून आहे. त्यानुसार वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल होवून पाहणी केली. तेथे नीलगाय मृतावस्थेत आढळून आली. त्यानुसार आरोपी जुन्नी यास ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली. मास विकण्याच्या उद्देशाने वन्यप्राणी नीलगायीच शिकार केल्याची कबुली त्याने दिली. 

भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार वनगुन्हाची नोंद करून १३ जानेवारी रोजी आरोपीस अटक केली. नागपूर ग्रामीण न्यायालयात आरोपीस न्यायालयात हजर केले असता २२ जानेवारीपर्यंत आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक नागपूर प्रभुनाथ शुक्ला, सहाय्यक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवर, वनपरिक्षेत्र अधिकारी (अतिरिक्त कार्यभार बुटीबोरी) व्ही.एम.जरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक एस.जी.जाधव, केंद्रे, ए.एस.नागरगोजे, डी.वाय.सुरभलावी, ए.पी.मोडक, एम.टी.मुंडे, के.व्ही.चव्हाण, एन. एच.रंगारी आदींनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

Latest Marathi News Live Update : 'अशा बिनकामाच्या गोष्टींवर मोदी नक्कीच बोलतील..'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याबाबत प्रियांका गांधींची प्रतिक्रिया

Game Of Thrones : लॅनिस्टर गादीचा वारस हरपला.. 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; पार्टनरची पोस्ट चर्चेत

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

SCROLL FOR NEXT