Tehsil police arrested thieves by setting a trap
Tehsil police arrested thieves by setting a trap 
नागपूर

दिवसभर शोधायचे कुलूपबंद घर आणि रात्री करायचे हा प्रकार 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सकाळी घराची पीओपी करून रात्रीच्या सुमारास घरफोड्या करणाऱ्या कुख्यात चोरट्यांना तहसील पोलिसांनी सिनेस्टाइल सापळा रचून अटक केली. सचिन डोनूजी गजघाटे (वय 35, मूळ रा. जयराबोडी, चिमूर) व अक्षय नत्थूजी बघेले (वय 20, रा. आमगाव, गोंदिया) अशी अटकेतील घरफोड्यांची नावे आहेत. 

सचिन व अक्षय या दोघांची कारागृहात ओळख झाली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर दोघेही हुडकेश्‍वरमधील म्हाळगीनगर परिसरात राहायला लागले. दोघे सकाळी पीओपीचे काम करून कुलूप बंद घर शोधायचे. रात्री त्या घरी चोरी करायचे. अशाचप्रकारे या दोघांनी तहसील भागात दोन घरफोड्या केल्या. याप्रकरणी तहसील पोलिसांनी घरफोडीचे गुन्हे दाखल केले. तहसील पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक स्वप्निल वाघ, हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण शेंडे, प्रमोद शनिवारे, शिपाई शैलेश, किशोर, प्रवीण, कृष्णा, मनीष यांनी घरफोड्यांचा शोध सुरू केला. 

पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दोघांना अटक केली. त्यांच्याकडून अजनी, हुडकेश्वर व तहसीलमधील चार घरफोड्या उघडकीस आणल्या. दोघांकडून आयपॅड, एलसीडी, मोटारसायकलसींसह पीओपीचे साहित्य जप्त करण्यात आले. दोघांकडून आणखीही घरफोडीच्या घटना उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. 
 

12 जुगाऱ्यांना अटक 

यशोधरानगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर एका इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्डयावर धाड टाकली. यावेळी 12 जुगाऱ्यांना रंगेहात अटक करण्यात आली. आरोपींमध्ये धम्मदीपनगर निवासी लोकेश मोहाडीकर (32), राधेश्‍याम बारापात्रे (35), राकेश केळकर (29), अभिजित बिजवे (24), उमेश हेडाऊ (26), युवराज मोहाडीकर (30), साहील वालदे (24), प्रल्हाद पराते (28), मंगेश वाघमारे (24), चीमाबाईपेठ निवासी ललित आंभूरकर (24), गुलशननगर निवासी संतोष लांजेवार (30) आणि सागर निषादराज (23) यांचा समावेश आहे. पोलिसांना माहिती मिळाली होती की, काही तरुण धम्मदीपनगरात लोकेश मोहाडीकरच्या इमारतीतील एका खोलीत जुगार खेळत आहेत. माहितीच्या आधारावर पोलिसांनी तेथे धाड टाकून वरील आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून रोख 6450 रुपये, 8 मोबाईल, ताश पत्ते आणि 2 दुचाकी वाहन असा 1.67 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT