Tejas Thackeray Will Research on Landsnail  
नागपूर

मुख्यमंत्री पुत्र तेजस ठाकरे करणार  संशोधन.. कशाचे वाचा….

राजेश रामपूरकर

नागपूर, :  राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी त्यांचा धाकटा मुलगा तेजस ठाकरेला शुक्रवारी झालेल्या बैठकीत गोगलगाय प्रजातीचे संशोधन करण्याची परवानगी दिली. ती उद्धव ठाकरे यांनी मुलाला वाढदिवसाच्या दिवशी दिलेली ही आगळी वेगळी भेट ठरली आहे. 

राज्य सरकारच्या वन्यजीव मंडळाची १५ वी बैठक शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत धाकटा मुलगा व वन्यजीव अभ्यासक तेजस ठाकरे, अनिकेत मराठे, स्वप्निल पवार, अमृत भोसले या चार मित्रांचा जमीन गोगलगाय (लॅंडस्नेल) प्रजातीच्या संशोधनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या संशोधन प्रकल्पाकरिता राज्यातील उत्तर-पश्चिम घाटातील संरक्षित क्षेत्रामधून जमीन गोगलगायींचे नमुने गोळा करण्याची परवानगी दिली. शुक्रवारी ७ ऑगस्टलाच तेजसचा वाढदिवस होता हे विशेष. 

या संशोधनामुळे या प्रजातीचा अभ्यास केला जाणार आहे. त्याची अंतगर्त माहिती प्राप्त होणार आहे. त्यामुळे भविष्यकाळात या स्थळांना अधिक सुरक्षित करता येणार आहे. 
जैवविविधता, खनिज संपत्ती यांनी समृद्ध असलेला व अनेक प्रजातींचा अधिवास पश्चिम घाटात आहे. फक्त झाडांवर राहणाऱ्या बेडकांची अंडी खाणाऱ्या मांजऱ्या सापाच्या नवीन प्रजातीचा शोध तेजस ठाकरेंनी लावला होता. त्याला सापाला ‘ठाकरेंचा मांजऱ्या साप’ म्हणून नाव देण्यात आलं. तेजस आणि त्यांच्या चमूने पालींच्या दोन नवीन प्रजाती शोधल्या आहेत. कोयनेच्या खोऱ्यातून सापडलेल्या पालीच्या प्रजातीला ‘निपास्पिस कोयनाएन्सिस’ आणि आंबाघाटामधून सापडलेल्या प्रजातीला ‘निमास्पिस आंबा’ अशी नावं देण्यात आली आहेत. 

तेजस यांनी खेकड्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावला असून हा खेकडा ‘ठाकरे’ यांच्याच नावानं ओळखला जात आहे. लाल-जांभळ्या व भगव्या रंगाच्या या खेकड्याला ‘ग्युबर्नेटोरियन ठाकरे’ असं नाव देण्यात आल आहे. कोकणातील जंगलात दुर्मीळ सापांच्या जाती शोध घेण्यासाठी गेलेल्या तेजसला सावंतवाडीजवळच्या रघुवीर घाटावर असलेल्या धबधब्यात खेकड्यांच्या पाच नव्या जाती सापडल्या आहेत. 

ठाकरे परिवार वन्यजीव प्रेमी 

माझे वडील वन्यजीव प्रेमी, मी पण वन्यजीव प्रेमी आहे. माझी पोर एक पाऊल पुढे निघाली असून ते संशोधनात उतरली आहेत असे सांगून नवयुवकांनी वन्यजीवांच्या अभ्यासाचे प्रशिक्षण देऊन नैसर्गिक संपत्तीचे संगोपन करायला हवे असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत व्यक्त केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT