nagpur sakal
नागपूर

Nagpur Winter Update : गुरुवारची रात्र ठरली मोसमातील सर्वात थंड ; नागपूरच्या पाऱ्यात पुन्हा सहा अंशांची घट

विदर्भातील थंडीच्या लाटेने उग्र रूप धारण केले असून, नागपूरच्या पाऱ्यात पुन्हा सहा अंशांची घट झाली आहे. शहरात गुरुवारी नोंद झालेले ८.७ अंश सेल्सिअस तापमान विदर्भात नीचांकी ठरले. नागपूरकरांसाठी गुरुवारची रात्र या मोसमातील सर्वात थंड राहिली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भातील थंडीच्या लाटेने उग्र रूप धारण केले असून, नागपूरच्या पाऱ्यात पुन्हा सहा अंशांची घट झाली आहे. शहरात गुरुवारी नोंद झालेले ८.७ अंश सेल्सिअस तापमान विदर्भात नीचांकी ठरले. नागपूरकरांसाठी गुरुवारची रात्र या मोसमातील सर्वात थंड राहिली.

जम्मू-काश्मीरसह डोंगराळ भागांमध्ये सुरू असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे विदर्भात दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत आहे. सध्या विदर्भात सगळीकडेच थंडीची तीव्र लाट अनुभवायला मिळत आहे. गुरुवारी लाटेचा सर्वाधिक प्रभाव नागपुरात जाणवला. लाटेमुळे गेल्या दोन दिवसांत नागपूरच्या तापमानात तब्बल अकरा अंशांची घसरण झाली. मंगळवारी १९.४ वरून पारा काल १४.६ अंशापर्यंत घसरला होता. आज पुन्हा ५.९ नी घसरून नीचांकी ८.७ अंशावर स्थिरावला. त्यामुळे गुरुवारची रात्र नागपूरकरांसाठी यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात थंडगार रात्र ठरली. याआधी १९ डिसेंबरला नागपुरात नीचांकी (९.४ अंश सेल्सिअस) तापमानाची नोंद करण्यात आली होती.

विदर्भातील यवतमाळ (९.० अंश सेल्सिअस), गोंदिया (९.५ अंश सेल्सिअस), अकोला (९.५ अंश सेल्सिअस), बुलडाणा (१०.० अंश सेल्सिअस), वर्धा (१०.६ अंश सेल्सिअस) या जिल्ह्यांमध्येही थंडीचा कहर दिसून आला. बोचरे वारे व हुडहुडीमुळे आबालवृद्धांसह सर्वच जण त्रस्त आहेत. कडाक्यामुळे नागरिकांना ऊनी कपड्यांसह शेकोट्यांचाही आधार घ्यावा लागत आहे. थंडीसाठी सध्या अनुकूल वातावरण असल्यामुळे या आठवड्यात पारा आणखी घसरण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT