Temple closed, How to do worship in Shravan?  
नागपूर

लॉकडाऊनमुळे मंदिर बंद, श्रावणात कशी करणार पूजा ? वाचा

राजेश प्रायकर

नागपूर : सणावाराचा महिना श्रावण उद्या, मंगळवारपासून सुरू होणार आहे. श्रावणात अनेकजण शिवमंदिर तसेच इतरही मंदिरात पूजेला मान देतात. मात्र लॉकडाऊनमुळे मंदिरे बंद असल्याने भाविकांनी घरीच महादेवाचा जाप, पूजा करावी, असा सल्ला बेसा येथील स्वामी समर्थ मंदिराचे संचालक दिनकर कडू यांनी दिला आहे. यानिमित्त नागरिकांना खऱ्या अर्थाने घरही मंदिर करण्याची संधी येणार आहे. 


श्रावणात महादेवाच्या आराधनेला महत्त्व आहे. दरवर्षी शहरातील विविध मंदिरात ओम नमः शिवाय जाप, शंखध्वनी ऐकायले मिळते. त्यामुळे महिनाभर मंदिरांमध्ये गर्दी दिसून येत होती. महिला मोठ्या संख्येने महादेवाला बेल आदी वाहतात. परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अजूनही लॉकडाऊन सुरू आहे.

लॉकडाऊनमध्ये काही बाबतीत शिथिलता दिली असली तरी त्यात मंदिरांचा समावेश नाही. त्यामुळे अजूनही मंदिर बंद असल्याने श्रावणात पूजा कशी करणार? असा प्रश्‍न शिवभक्त, महिलांना पडला आहे. मंदिर बंद असल्याने शिवभक्त, इतर भाविकांनी घरीच जाप, आराधना करावी. त्यामुळे कोरोनासंबंधी नियमाचे पालनही होईल आणि पूजेचे समाधानही मिळेल, असे दिनकर कडू म्हणाले.

भाविक घरच्या घरीच महादेवाची आराधना करू शकतात. घरातील पूजेच्या ठिकाणी महादेवाची मूर्ती, पिंड आता प्रत्येकाकडेच असते. त्यामुळे बाहेर मंदिरात जाण्याचा मोह टाळून घरीच पूजा केल्याने घरात भक्तीमय वातावरणाची निर्मिती होईल. 

श्रावणात नेमके काय केले जाते? 
श्रावणातील सोमवारला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोमवारी घरातील पिंडीवर महिला बेल वाहून आराधना करतात. याशिवाय अनेकजण "ओम नमः शिवाय'चा 108 वेळा जाप करतात. ज्यांना 108 वेळा जाप शक्‍य नसेल ते 11 वेळ करतात. अनेकजण अभिषेकही करतात. मंदिर बंद असल्याने पूजेच्या या सर्व विधी आता घरांमध्येच कराव्या लागणार आहे. परिणामी यंदाच्या श्रावणात प्रत्येकच घर मंदिर भासणार आहे. 

यंदा या मंदिरात नसेल गर्दी 
शहरातील तेलंगखेडी येथील कल्याणेश्‍वर मंदिर, महाल येथील कल्याणेश्‍वर मंदिर, जागनाथ बुधवारी येथील शिव मंदिर, मानेवाडा रोडवरील शिव मंदिरात दरवर्षी श्रावणात मोठी गर्दी दिसून येत होती. यंदा कोरोनामुळे मंदिरे बंद आहेत. परिणामी शहरातील अनेक शिवभक्तांसाठी आराध्य असलेल्या मंदिरांमध्ये यंदा गर्दी दिसणार नाही. मंदिरातून अभिषेक, जाप, शंखध्वनीही क्वचितच ऐकू येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV New Rules : सरकारची करडी नजर तुमच्या टीव्हीवर! मोफत टीव्ही पाहणे पडेल महागात? TRAIचे नवीन नियम जाणून घ्या

इराणमध्ये घुसून अमेरिकेच्या SEALने पायलटला सुखरुप परत आणलं; भारताकडेही आहे MARCOS, पाकिस्तानला कळणारही नाही की...

Pakistan Petrol Rate : पेट्रोल दरवाढीनंतर पाकिस्तानमध्ये जनतेचा संताप उसळला; एक लीटरची किंमत ऐकून धक्का बसेल

Sangli Crime : रक्ताळलेली सांगली! 4 दिवसांत 6 खून; कुपवाडमध्ये पत्नीनेच पतीला संपवलं, तर कवलापूरच्या यात्रेत अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या

Chhatrapati Sambhajinagar: पीएनजी कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था; बजाजनगरमध्ये उखडलेले रस्ते पूर्ववत न केल्याने नागरिक त्रस्त

SCROLL FOR NEXT