नागपूर

उपराजधानीत ‘सुपर स्प्रेडर्स'ची दिसेल तिथे चाचणी; ११ मोबाईल व्हॅनमधून सहा हजार टेस्ट

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेने (Nagpur NMC) कोरोनाची साखळी (Corona chain) खंडीत करण्यासाठी आता सुपर स्प्रेडर्सवर (Corona Super Spreader) लक्ष केंद्रीत केले आहे. बाजारपेठ, रस्ते, बॅंक, शासकीय व खाजगी कार्यालये, दुकाने अशा ठिकाणी शनिवारी सहा हजारावर सुपर स्प्रेडर्सची चाचणी केली. दही झोनमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही मोहिम राबविली. शहरात कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आला असला तरी महापालिकेने ही साखळी कायमची खंडीत करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या. दुकाने, पेपरवाले, भाजीपाला विक्रेते, बॅंक, खाजगी, शासकीय कार्यालयात अनेकजण कामे करीत आहे. त्यांच्यात लक्षणे नसली तरी अनेकांच्या संपर्कात येत आहे. (testing of super spreaders on road in Nagpur)

त्यामुळे ते सुपर स्प्रेडर्स आहेत, असे मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांंनी सांगितले. या सर्वांची चाचणी करण्यासाठी काल, शनिवारपासून महापालिकेने मोहिम सुरू केली. यासाठी ११ मोबाईल व्हॅनचा उपयोग करण्यात येत आहे. याशिवाय ४५ चाचणी केंद्रावर नेऊनही सुपर स्प्रेडरची चाचणी करण्यात येत आहे. सकाळ सहा ते रात्री आठवाजेपर्यंत ही मोहिम राबविण्यात आली.

काल, पहिल्या दिवशी दहाही झोनमध्ये सहा हजारांवर नागरिकांची चाचणी करण्यात आली. सध्या अस्तित्वात असलेल्या चमूव्यतिरिक्त आता नवीन १० चमूसुद्धा तयार करण्यात आल्या आहेत. नवीन चमूच्या माध्यमातून बालकांची तसेच मधुमेह आज़राने त्रस्त नागरिकांची चाचणी करण्यात येणार आहे. आशीनगर झोनमध्ये काल, प्रभाग २, ३, ६ व ७ मध्ये इंदोरा चौक ते कमाल चौकपर्यंत नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.

येथे ६३७ सुपर स्प्रेडर व २५९ इतर नागरिकांची चाचणी करण्यात आली. झोनल वैद्यकीय अधिकारी कुरेशी यांच्या नेतृत्वात अश्विन बोदेले, गौर यांनी ही मोहिम राबविली. दरम्यान, मनपाने कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी विशेष शिबीर आयोजित करून चाचणी केली. विविध आजाराने ग्रस्त, सिकलसेल रुग्ण यांचीसुद्धा चाचणी करण्यात येणार आहे. यात डॉ. संगम मकड़वाड़े, डॉ. पराग ढाके, डॉ. गोपाल समर्थ यांचे सहकार्य मिळत आहे.

(testing of super spreaders on road in Nagpur)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT