turmeric crop  sakal
नागपूर

बदलत्या वातावरणाचा हळद पिकाला फटका

गहू, हरभरा पिकांचे उत्पन्न देखील कमी होण्याची भीती

संतोष गिरडे

शिरपूर जैन : अचानक येणारा पाऊस, धुके त्यात तीव्र थंडीची लाट अशा बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची भिस्त असलेल्या हळद पिकाच्या उत्पादनाला फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच रब्बीचे गहू, हरभरा या पिकांचे सुद्धा उत्पन्न घटणार असल्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता दिसून येत आहे. अशा नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे.

सध्या दिवसा ऊन तर रात्रीला थंडीचा पारा चांगलाच खाली येत आहे, मध्येच धुके त्याचा विपरीत परिणाम पिकावर होऊ लागल्याने तुरीचे कमालीचे घटलेले उत्पन्न त्यानंतर हळद सुद्धा करपत आहे. तर गहू देखील कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कडाक्याची थंडी, धुके मध्येच पाऊस यामुळे एकूणच पिकावर विपरीत परिणाम होत असून खरिपातील सोयाबीन पीक हातचे गेले तर आता तुरीचे उत्पन्न अगदीच मोजके झाले.

आता शेतात उभे असलेले गहू, हळद पीक देखील वातावरणातील बदलामुळे नुकसानग्रस्त होऊ लागल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम पिकाच्या उत्पन्नावर होणार आहे. वातावरणातील कमालीच्या बदलामुळे हळदीची पाने वळू लागली आहेत तर गहू कमजोर होत आहे, त्यामुळे या दोन्ही पिकांच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil : गौतमी पाटील पोलिसांच्या रडारवर का आली? नेमकं प्रकरण काय? तपासाची चक्र फिरणार!

IND vs WI 1st Test Live: भारताचं रात्री अचानक ठरलं, जाहीर केला अचंबित करणारा निर्णय! वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत ड्रामा

Latest Marathi News Live Update : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत घेणार बैठक

Italy Road Accident : पर्यटनासाठी गेलेल्या अख्तर कुटुंबावर काळाचा घाला; इटलीतील भीषण अपघातात नागपूरच्या दाम्पत्याचा मृत्यू, मुलगी गंभीर

Shakti Cyclone : अतिवृष्टीनंतर आणखी एक अस्मानी संकट! 'शक्ती' चक्रीवादळ महाराष्ट्राच्या वेशीवर, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा...

SCROLL FOR NEXT