नागपूर

बायकोशी भांडण झाल्याने महेशची आत्महत्या; हा पोलिसांचा नीचपणाचा कळस

राजेश चरपे

नागपूर : पोलिसांच्या मारहाणीमुळे नव्हे तर बायकोशी भांडण झाल्याने महेश राऊत यांनी आत्महत्या केली असे सांगणाऱ्या नागपूर पोलिसांनी नीचपणाचा कळस गाठल्याचा आरोप भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला. पोलिस आयुक्त आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी धडपड करीत असून, अद्यापही गुन्हा दाखल केला नसल्याचेही वाघ सांगितले.

एका मनोरुग्णाला मदत मिळवून देण्यासाठी महेश राऊतने पोलिस कंट्रोल रुमच्या १०० नंबरवर कॉल केला. घटनास्थळाच्या शोधा दोन बीट मार्शल निघाले होते. त्यांनी महेशला स्थळ शोधण्यासाठी फोन केला. फोन चार्जिंगला लावला असल्याने तो त्याने उचलला नाही. येवढ्या छोट्या कारणावरून पोलिसांनी सर्वांसमोर त्याला मारहाण केली. हा अपमान सहन झाल्याने महेशने आत्महत्या केली.

आपण आज महेशच्या कुटुंबीयींच्या भेट घेतली. तो एका खाजगी कंपनीत अकाऊंट म्हणून कार्यरत होता. त्याच्या जाणाने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यांची दोन लहान लहान मुले व पत्नी धक्क्यातून सावरली नसल्याचे वाघ यांनी सांगितले. दुसरीकडे मेयो हॉस्पिटलसारख्या गजबलेल्या परिसरात एका अल्पवयीन तरुणीला अत्याचार करून दोन वेळा सोडण्यात आले असताना शहरातील सर्व्हिलन्स यंत्रणा व तेथे नियुक्त पोलिस काय करत होते आणि त्यांना ही घटना दिसली नाही का, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, नीत ठाकरे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने आदी उपस्थित होते.

राठोड यांचा संवाद जाहीर करा

माजी मंत्री संजय राठोड प्रकरणात फॉरेन्सिक लॅबचा अहवाल अलीकडेच आला पण, नियंत्रण कक्षाला त्यावेळी फोन केला असता तेथून अन्य क्रमांक देण्यात आला. हा क्रमाक कुणाचा आहे व यावरील संवाद हे जाहीर करण्यात यावे आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. सत्य समोर येणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT