नागपूर

डॉक्टर मुलीने फोनवर केले मार्गदर्शन अन् अख्खं कुटुंब झाले कोरोनामुक्त

नरेंद्र चोरे

नागपूर : कोरोनाच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेत अनेक परिवारांवर संकट कोसळले. कुठे दोन, कुठे चार तर कुठे अख्खे कुटुंब संक्रमित झाले. वर्धमाननगर येथे राहणाऱ्या मिश्रीकोटकर कुटुंबातही (Mishrikotkar family) एकाचवेळी पाच जणांना बाधा झाली होती. मात्र, शेकडो किमी अंतरावर असलेल्या डॉक्टर मुलीने (Doctor's daughter) योग्य मार्गदर्शन करून म्हाताऱ्या आई-वडिलांसह इतरांनाही या संकटातून बाहेर काढले. (The family became better with the guidance of the doctors daughter)

८२ वर्षीय महावीर मिश्रीकोटकर यांच्या परिवारात ७७ वर्षीय पत्नी, मुलगा, सून आणि अकरा वर्षांची नात असे पाच एकूण सदस्य आहेत. गेल्या महिन्यात अचानक वकील असलेल्या त्यांच्या मुलाला सर्दी व खोकला झाला. फॅमिली डॉक्टरकडे गेले असता त्यांना कोरोनाची लक्षणे वाटल्याने चाचणी करण्याचा सल्ला दिला.

आरटीपीसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर इतरांनीही चाचण्या करून घेतल्या. त्यात चारही जणांना लागण झाल्याचे आढळून आले. मात्र, घाबरून न जाता महावीर यांनी लगेच सोलापूरमध्ये डॉक्टर असलेल्या मुलीला (डॉ. दीप्ती गोरे) यांना फोन करून मार्गदर्शन घेतले. सध्या दिवसरात्र कोरोना रुग्णांच्या सहवासात वावरत असलेल्या डॉ. दीप्ती यांनी त्यांना घरीच उपचार घेण्याचा सल्ला दिला.

सकारात्मक दृष्टिकोण, उपचारांचा लाभ

डॉक्टर मुलीने लगेच औषधगोळ्या लिहून नागपुरातीलच एका ओळखीच्या व्यक्तीच्या हातून घरी पाठवल्या. शिवाय दोन आठवडे त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सर्वांशी संपर्क साधून नियमित फॉलोअप घेतला. अखेर त्यांच्या मार्गदर्शनामुळे पाचही जण कोरोनामुक्त झाले. संक्रमणापूर्वी लस घेतल्याचा खूप फायदा झाल्याचे मिश्रीकोटकर यांनी सांगितले. सकारात्मक दृष्टिकोणासोबतच योग्य मार्गदर्शन आणि नियमित उपचारामुळेच कोरोनावर विजय मिळवू शकल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

संक्रमण काळात आम्ही सर्वांनी एकमेकांची खूप काळजी घेतली. उपचारासोबतच दररोज सकाळी व्यायाम, प्राणायाम व मॉर्निंग वॉक केला. कोरोनाचे सर्व नियम तंतोतंत पाळले. उल्लेखनीय म्हणजे, आमच्या डॉक्टर मुलीने वेळोवेळी फोनवरून मार्गदर्शन करून आत्मविश्वास वाढविला. त्यामुळेच आम्ही कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू शकलो. (The family became better with the guidance of the doctors daughter)
- महावीर मिश्रीकोटकर, ज्येष्ठ नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमित शाहांच्या पंतप्रधानपदाची तारीख सांगितली पण मालीवाल यांचा प्रश्न आल्यावर मात्र... केजरीवालांच्या मदतीला धावले अखिलेश

SRH vs GT : हैदराबादला प्ले-ऑफचे तिकीट की गुजरात शेवटच्या लढतीत घालणार विजयाला गवसणी... कोण पडणार कोणावर भारी?

Sharad Pawar: बारामतीच्या मतदानानंतर अजित पवार प्रचारातून गायब? शरद पवारांनी व्यक्त केली काळजी

Latest Marathi News Live Update : मुंबई- अहमदाबाद मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Swati Maliwal News : दिल्लीच्या राजकारणात भूकंप! कुठे आहेत स्वाती मालीवाल? मारहाणीच्या मुद्द्यावरुन भाजपने 'आप'ला घेरलं

SCROLL FOR NEXT