The first Super Moon 2022 14June in this year  sakal
नागपूर

वर्षातील पहिला सुपर मून १४ जूनला

पहिला ‘सुपरमून’ १४ जून रोजी रात्री पौर्णिमेच्या दिवशी दिसणार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : खगोल प्रेमींसाठी हा महिना महत्त्वाचा आहे. कारण पहिला ‘सुपरमून’ १४ जून रोजी रात्री पौर्णिमेच्या दिवशी दिसणार आहे. पृथ्वी-चंद्र हे अंतर नेहमी सरासरी ३ लाख ८५ हजार किलोमीटर असते, परंतु मंगळवार, १४ जून रोजी हे अंतर सरासरी ३ लाख ५७ हजार ४३६ किलोमीटर कमी राहील. त्यामुळे चंद्रबिंब मोठे व प्रकाशमान दिसेल, चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तीव्रता वाढणे, वादळ यासारख्या घटना घडू शकतात. यावर्षी एकूण ३ ‘सुपरमून’ दिसणार आहेत.

या सुपरमूनला ‘रोझ मून’ हे नाव दिले आहे. यादिवशी चंद्र मोठा दिसेल. चंद्र जास्त तेजस्वी असणार आहे. पृथ्वी आणि चंद्रामध्ये सर्वाधिक कमी अंतर हे २५ नोव्हेंबर २०३५ रोजी असेल. ६ डिसेंबर २०५२ रोजी शतकातील सर्वात मोठा सुपरमून पाहायला मिळेल. पृथ्वीवरून आपल्याला नेहमी चंद्राचा ५९.५ भाग पाहता येतो. चंद्रावरून पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते. चंद्रावरून पृथ्वीवर प्रकाशकिरण येण्यास १.३ सेकंद लागतात.

जेव्हा पृथ्वी-चंद्र हे अंतर ३,७०,००० कि. मी.च्या आत असते, त्याला ‘सुपरमून’ असे म्हणतात. चंद्राचे वय हे ४.६५ अब्ज वर्ष आहे. चंद्र हा पृथ्वीपासून दरवर्षाला ३.८ सेंटीमीटर लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होईल व १०० वर्षांनी दिवस हा २ मिली सेकंदने मोठा होईल. चंद्रावर ३० हजार विवरे व १२ पर्वत आहे. पर्वत व विवरे दुर्बिणीमधून अगदी चांगल्याप्रकारे पाहता येतात.

साध्या डोळ्यांनीही बघता येईल

१४ जून रोजी रात्री दिसणारा सुपरमून खगोलप्रेमींनी मीं व जिज्ञासूंनी अवश्य बघावा. हा सुपरमून अगदी साध्या डोळ्यांनी पाहता येईल, अशी माहिती ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT