नागपूर

अल्पवयीनसोबत लग्नाचा तगाद्यावरून मजव्याने केला लहान भावाचा खून

दिलीप गजभिये

खापरखेडा (जि. नागपूर) : दहेगाव (रं) येथे मधल्या भावाने घरीच धारदार शस्त्राने लहान भावाची हत्या (murder in Nagpur rural) केली. ही घटना गुरुवारी (ता. १) दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. गितेश रामदास मानकर (वय २९, रा. दहेगाव रं.) असे मृताचे नाव आहे. आरोपी भावाने धारदार चाकूने लहान भावाचा गळा कापून व पोटावर वार करून रक्ताच्या (brother killed smaller brother) थारोळ्यात लोळविले. यादरम्यान गितेश याने घटनास्थळीच प्राण सोडले. (The-middle-brother-murdered-the-smaller-brother)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गितेश मानकर हा आई-वडिलांसह दहेगाव येथे राहत होता. त्याचा मधला भाऊ आरोपी सतीश मानकर हा वलनी आणि मोठा भाऊ जगदीश (वय ३६, रा. खंडाळा, ता. पारशिवनी) येथे राहतो. गितेशचे मोहल्यातच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तो घरी लग्नाचा तगादा लावत होता. गितेशचे ज्या मुलीशी प्रेमसंबंध होते, ती अल्पवयीन असल्याची घटनास्थळी चर्चा होती.

अल्पवयीन मुलीशी लग्नास भाऊ सतीशचा विरोध होता. यावरून दोघांचा वाद होत होता. गुरुवारी गितेश व सतीश या भावांनी दारू ढोसली. नशेत दोघेही तर्र झाले. घटनास्थळी दारूच्या बाटलीचे झाकण आढळून आले. लग्नाच्या तगाद्यावरून दारूच्या नशेतच वाद विकोपाला गेल्याने सतीशने गितेशचा चाकूने गळा चिरून व पोटावर वार करून हत्या केली. घटनेच्यावेळी आई-वडील बाहेर असल्याची माहिती आहे.

हत्या केल्यानंतर आरोपी घरीच झोपला. मोठ्या भावाला घटनेची माहिती मिळाल्यावर त्याने खून झाल्याची माहिती खापरखेडा पोलिसांना दिली. लागलीच नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिस वीरेंद्र नरड व खापरखेडा पोलिस उपनिरीक्षक निमगडे, एएसआय चंद्रभान जळतेसह चमूने घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळावरून आरोपींकडून धारदार चाकू जप्त करण्यात आला व अटक करण्यात आली.

नेहमी वाद होत असल्याची माहिती

गितेशचे वस्तीतील अल्पवयीन मुलीशी मागील अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. तो भावाला त्याच मुलीशी लग्न करण्यासाठी तगादा लावायचा. मात्र, आरोपी सतीश त्याला मुलगी अल्पवयीन आहे, दोन वर्षे थांब. नंतर लग्न लावून देण्यास हरकत राहणार नाही, असे म्हणून समजवायचा. परंतु, गितेश हा दारू पिऊन घरी लग्नाचा तगादा लावून नेहमी वाद करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

(The-middle-brother-murdered-the-smaller-brother)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT