राष्ट्रवादी कोळसा घोटाळ्याची ईडीकडे तक्रार करणार sakal
नागपूर

राष्ट्रवादी कोळसा घोटाळ्याची ईडीकडे तक्रार करणार

राज्य खनिकर्म महामंडळाने वर्षाला २२ दशलक्ष मेट्रिक टन वॉश कोळसा पुवरठ्यासाठी नियुक्ती केली आहे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाजनेको आणि राज्य खनिकर्म महामंडळाच्या परस्पर सहमतीने सुरू असलेल्या रिजेक्ट कोळसा घोटाळ्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सीबीआय आणि ईडीकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्य खनिकर्म महामंडळाने वर्षाला २२ दशलक्ष मेट्रिक टन वॉश कोळसा पुवरठ्यासाठी नियुक्ती केली आहे. खनिकर्म महामंडळाने एसईसीएल ७ दशलक्ष मेट्रिक टन, डब्लयूसीएल १० दशलक्ष आणि एमसीएलच्या खानीतून ५ दशलक्ष मेट्रिक टन कोळसा घेण्याचा करार केला आहे. त्यापैकी हिंद एनर्जी कोल वॉशरी कंपनीला ८० टक्के आणि आणखी एका कंपनीला २० टक्के कोल वॉशचे कंत्राट दिले आहे. एकूण कोळसा वॉश केल्यानंतर सरासरी १५ ते २० टक्के कोळसा खराब असल्याचे वा ऊर्जा निर्मितीच्या दर्जाचा नसल्याचे ठरवून त्यास रिजेक्ट केला जातो. हा रिजेक्ट कोळसाच घोटाळ्याचे मूळ कारण आहे.

रिजेक्ट झालेल्या कोळशाची बाजारात दोन हजार रुपये मेट्रिक टन असे दर आहे. मात्र महाजेनकेच्यावतीने ३१० रुपये मेट्रिक टनाने विकल्या जात आहे. पाच वर्षांत या कोळशाच्या लिलावातून ४ हजार ७६० कोटींचा महसूल प्राप्त होऊ शकतो. मात्र यात मलिदा मिळण्याची शक्यता नसल्याने महाजेनको आणि खनिकर्म महामंडळाचे अधिकाऱ्यांनी कोल वॉशरीला विकण्याचा करार केला आहे.

या सर्व घोटाळ्याचे दस्तावेज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सोपवण्यात आले आहे. कोळसा हा विषय केंद्राच्या अखत्यारित असल्याने सोमवारी ईडी आणि सीबीआयडीकडे पुराव्यानिशी तक्रार करण्यात येणार असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अविनाश गोतमारे, सी.ए. विजयकुमार शिंदे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sankeshwar Banda Road Toll Plaza : संकेश्वर -बांदा रोडवरील आजऱ्याचा टोल हलणार; नितीन गडकरींचे आदेश, प्रकाश आबिटकरांनी दिली माहिती

Karad Traffic Jam : पुणे-बंगळूर हायवेवर कराडजवळ वाहतुकीचा बोजवारा, ट्रॅफिक जाम; कोल्हापूर नाक्यावर सव्वातीन किलोमीटरचा उड्डाणपूल ठरतोय डोकेदुखी, रस्ते कधी होणार मोकळे?

Highway Accident : शिर्डीला देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! कंटेनरने दुचाकीला पाऊण किलोमीटर फरफटत नेलं, 30 वर्षीय डाॅक्टरसह तिघांचा दुर्दैवी अंत

MHADA: म्हाडा जमिनींचे सोने करणार, जाहिरातींसाठी जागा भाड्याने देणार

पोलिसांनी गळा पकडला, मारहाण अन् शिवीगाळ केली! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसोबत भयानक घडलं; बोर्डाची चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT