HIt and Run Case nagpur sakal
नागपूर

HIt and Run Case : रितूच्या प्रकरणांवर एकाच न्यायपीठात सुनावणी घ्या,फिर्यादींची मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयाला विनंती

HIt and Run Case : रितिका मालूच्या पोलिस कोठडी आणि जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी एकाच न्यायपीठासमक्ष सुनावणी घेण्याची विनंती मुख्य न्यायाधीशांकडे दाखल करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रितिका उर्फ रितू मालूची पोलिस कोठडी (पीसीआर) आणि जामीन अर्ज या दोन्ही प्रकरणांवर एकाच न्यायपीठासमक्ष सुनावणी घ्यावी, या विनंतीसह फिर्यादीने मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे अर्ज दाखल केला. त्यामुळे आजची सुनावणी उद्या (ता. ५) पर्यंत तहकूब करण्यात आली.

रामझुला येथे २४ फेब्रुवारी घडलेल्या या मर्सीडीज कार अपघात प्रकरणात दोघांचा मृत्यु झाला होता. तहसील पोलिसांचा तपास निष्पक्ष नसल्याने अपघातातील मृतकांच्या कुटुंबीयांची मागणी मान्य करीत उच्च न्यायालयाने तपास सीयआडीकडे हस्तांतरित केला. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी सत्र न्यायालयाने तिला दिलेला जामीन रद्द केला. पोलिसांनी २६ सप्टेंबरच्या पहाटे रितूला अटक केली.

नियमानुसार महिलेला रात्री अटक करता येत नाही. मात्र, रितू पळून जाण्याची शक्यता नकारता येत नाही, असे सांगत तिला रात्रीच अटक करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सीआयडीने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए.व्ही. खेडकर-गरड यांच्याकडे केली होती. अपवादात्मक स्थिती लक्षात घेता न्यायालयाने सीआरपीसीच्या कलम ४६ अंतर्गत रितुला सूर्यास्तानंतर व सूर्यास्तापूर्वी अटक करण्याची परवानगी दिली. त्यानुसार सीआडीने तिला रात्री अटक केली.

सीआयडीला बजावली नोटीस

या प्रकरणातील असाधारण घडामोडी लक्षात घेत न्या. सुराणा यांनी स्वत:हून पुनर्विचार अर्ज दाखल करवून घेतली. या प्रकरणी देण्यात आलेल्या निर्णयाची अचूकता, वैधता आणि औचित्य यासंबंधीची पडताळणी करवून घेण्यासाठी ही प्रक्रिया केली जात असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. या प्रकरणी सीआयडीला नोटीस पाठविण्यात आली असून सीडीआयने आपले उत्तर सादर करणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT