The robot will clean manhole Sakal
नागपूर

रोबोट करणार मॅनहोलची स्वच्छता, 'स्मार्ट सिटी'साठी मोठं पाऊल

स्मार्ट सिटीचा धडका : शहर स्वच्छतेसाठी क्रांतिकारक पाऊल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - शहरातील मॅनहोल स्वच्छतेसाठी आता रोबोटचा वापर करण्यात येणार आहे. नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने रोबोट खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून संचालक मंडळाने मंजूरही केला. त्यामुळे शहरातील सफाई कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना मॅनहोल्समध्ये प्रवेश करावा लागतो. आता प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील मॅनहोल्सच्या देखभालीमध्ये अधिक सुरक्षितता आणण्यासाठी स्मार्ट सिटीने पाऊल उचलले आहे. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या नुकताच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला स्मार्ट सिटीचे मेंटॉर आणि चेअरमन डॉ. संजय मुखर्जी मुंबईहुन ऑनलाइन उपस्थित होते.

महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी, संचालक मंडळ सदस्य अनिरुद्ध शेनवाई, आशिष मुकीम, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे, कंपनी सेक्रेटरी भानुप्रिया ठाकूर आणि मुख्य वित्त अधिकारी नेहा झा उपस्थित होते. सध्या केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगवर बंदी घालण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेकडे १० जेटींग मशीन आणि ४ सक्शन मशीन आहेत. रुंद रस्‍त्याव सिवेज चेंबरची स्वच्छता करण्यास मदत होते, पण अरुंद रस्त्यावर हे करणे अडचणीचे ठरते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रोबोटद्वारे स्वच्छता प्रणालीची मदत होणार आहे. आयओटीवर आधारित हे स्कॅव्हेंजिंग रोबोट लहान रस्त्यावर किंवा गल्ल्यांमध्ये सुद्धा सिवेज चेंबरच्या स्वच्छेतेत मदत करेल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले.

पोहरा नदीवर एसटीपी

नागपूर स्मार्ट सिटीतर्फे हुडकेश्वर-नरसाळा भागात पोहरा नदीवर २० एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला. संचालक मंडळाने या एसटीपी प्रकल्पालाही मान्यता दिली. या माध्यमातून पोहरा नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या प्रयत्न असल्याचे गोतमारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election Postponed in Kolhapur : गोकुळ अध्यक्ष निवड लांबणीवर, महायुतीचे संचालक गैरहजर; कोरमअभावी सभा तहकूब, सतेज पाटील काय करणार?

MLC Results : उद्धव ठाकरेंनी जी चूक केली तशी पुन्हा होऊ द्यायची नसेल तर... नागपूर, पुण्यात भाजपच्या पराभवानंतर केशव उपाध्ये यांची पोस्ट चर्चेत

IND vs NZ, 4th T20I: ईशान किशन फिट झाला, तर Playing XI मधून बाहेर कोण जाणार? सॅमसन-सूर्यवंशीबाबत काय निर्णय घेतला जाणार?

Latest Marathi News Update : विधानपरिषदेवरून भाजपचे आरोप, शिवसेनेनं काय दिली प्रतिक्रिया?

पराभव भाजपच्या जिव्हारी, महायुतीत मिठाचा खडा! शिवसेना युतीधर्म पाळणार का? बन यांचा थेट शिंदेंना सवाल

SCROLL FOR NEXT