नागपूर

हे चूक की बरोबर? खासदारांच्या राजकीय मागणीला नागरिकांचा विरोध

अजय धर्मपुरीवार

हिंगणा (जि. नागपूर) : हिंगण्यातील ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात (covid hospital) करा, या राजकीय मागणीला नागरिकांनी जोरकस विरोध (Opposition from citizens) केला आहे. तालुक्यात कोविडवर भरपूर सुविधा असताना गरीब नागरिकांना या रुग्णालयातून इतर आजारांवर मिळणाऱ्या सुविधा राजकीय श्रेयासाठी बंद करणार का, असा सवालही नागरिकांनी केला आहे. (The rural hospital should not be converted into covid Hospital)

तालुक्यातील ग्रामीण रुग्णांसाठी येथील धनगरपुऱ्यात ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. या ठिकाणी रुग्णांना अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. कोविड रुग्णालय सुरू झाल्यास रुग्णालयातील इतर सुविधा पूर्ण बंद होण्याची शक्यता आहे. यामुळे शेकडो रुग्णांची गैरसोय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवसेनेच्या खासदारांनी केलेली ही मागणी अनाठायी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

मग नागरिक कुठे जातील?

आता कोरोना रुग्णांच्या संख्येत घसरण होत आहे. या रुग्णालयात कोविड रुग्णालयाची निर्मिती झाल्यास रुग्णालयातील इतर सुविधा पूर्णतः बंद होण्याची दाट शक्यता आहे. या सुविधा बंद झाल्यास ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी कुठे जावे, हा यक्ष प्रश्न समोर उभा ठाकणार आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्यचिकित्सकांनी ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू न करता पूर्ववत असलेल्या सुविधा रुग्णांना देण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

...या आहेत सुविधा

  • तालुक्यातील कोरोना संकटावर मात करण्यासाठी कोरोना चाचणी केंद्र व लसीकरण मोठ्या प्रमाणात

  • कोविड रुग्णांसाठी लता मंगेशकर रुग्णालय डिगडोह येथे २३० बेड-वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे कोविड रुग्णालयात ३५० बेड ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची सुविधा

  • वानाडोंगरी येथील बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कोविड विलगीकरण केंद्र

(The rural hospital should not be converted into covid Hospital)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT