Theft Theft
नागपूर

प्रेमासाठी काही पण! प्रेमविवाह टिकविण्यासाठी ‘तो’ बनला चोर

पंकज उरकुडे याने डिसेंबर २०२१ मध्ये बेलतरोडी हद्दीतून अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते

अनिल कांबळे

नागपूर : प्रेयसीला पळवून नेऊन प्रेमविवाह केल्यानंतर संसार थाटण्यासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी युवकाने थेट चोरीचा (Theft) ‘धंदा’ सुरू केला. घरफोडी करून मिळविलेल्या पैशातून पत्नीसह नव्याने संसार थाटला. परंतु, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासात तो अडकला आणि पोलिसांच्या हाती लागला. पंकज कन्हय्यालाल उरकुडे (२०, रा. महाकालीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने मनीष ले-आऊटमध्ये राहणाऱ्या वकिलाच्या घरातून रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल चोरी केला होता. त्याच्या ताब्यातून एक लाख ७४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी पंकज उरकुडे याने डिसेंबर २०२१ मध्ये बेलतरोडी हद्दीतून अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. मुलीसोबत तो मोर्शी येथे राहात होता. संसार चालविण्यासाठी (Love marriage) त्याला पैशाची गरज होती. त्यामुळे त्याने त्याचा मित्र आणि अट्टल चोरटा प्रणव ठाकरे (रा. खामला) याची मदत घेतली. दोघांनीही २९ डिसेंबर रोजी सोनेगाव हद्दीत मनीष ले-आऊट येथील नीलेश शर्मा या वकिलाच्या घरी चोरी केली.

घटनेच्या वेळी शर्मा हे कुटुंबीयांसह पचमढी येथे गेले होते. ही संधी साधून दोघांनीही त्यांच्याकडे घरफोडी करून रोख एक लाख १८ हजार रुपये, ४ महागडे मोबाईल आणि मनगटी घड्याळ असा एक लाख ३४ हजारांचा ऐवज चोरून (Theft) नेला होता. दुसऱ्या दिवशी शर्मा कुटुंबीय घरी आले असता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी सायबरच्या मदतीने तपास केला असता चोरीचा एक मोबाईल पंकजकडे मिळून आला. त्यांनी बजाजनगर हद्दीत देखील चोरी केली होती. पोलिसांनी पंकज यास अटक करून त्याच्या ताब्यातून एक लाख ७४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस प्रणवचा शोध घेत आहेत. ही कामगिरी सोनेगाव ठाण्यातील पोलिस सुशील गवई, मुकेश महालगावे, नितीन बावणे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT