There are no demand for meat & chicken  
नागपूर

कोरोनाच्या भितीने चिकन, मटणाची मागणी 30 टक्केच!

सकाळ वृत्तसेवा

नागपूरः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने कोंबडी, अंडी आणि मटण खरेदीकडे तब्बल दीड महिन्यापासून नागरिकांनी पाठ फिरविल्याने पोल्ट्री उद्योगाचे नुकसान होत आहे. परंतु, कोंबडीमुळे कोरोना होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने कोंबडीच्या दुकानात चिकन खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी अनेक दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले. असे असले तरी नियमित मागणीच्या तुलनेत फक्त 30 टक्केच कोंबड्या आणि मटणाची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

कोरोनाचे विषाणू चिकन आणि अंडी यामधून पसरत असल्याच्या अफवा पसरल्याने मार्चमध्ये नागरिकांनी चिकन, अंडी मटण खाणे कमी केले होते. अनेक विक्रेत्यांनी त्यांच्याकडील अंडी व बॉयलर कोंबड्या गटारात फेकल्या. चिकन विक्रेते व पोल्ट्री फॉर्मच्या संचालकांना व विक्रेत्यांना 550 ते 600 कोटींपेक्षा अधिक नुकसान सोसावे लागले.
बॉयलर कोंबडी विक्रेत्यांनीही बाजारात कोंबड्यांचे वितरण बंद केले. त्यातच लॉकडाऊन जाहीर केल्याने बॉयलर कोंबड्या बाजारात येणे बंद झाल्या होत्या. बॉयलर कोंबडीमुळे कोरोना पसरत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनेकांनी चिकन खरेदीसाठी दुकानांत धाव घेतली. परंतु, दुकानात कोंबड्याच नसल्याने नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागत होते. दोन आठवड्यापासून कोंबड्यांचा पुरवठा सुरळीत झाल्याने नागरिक चिकन खरेदीकडे वळले आहेत. आज रविवारचा मुहूर्त साधत अनेकांनी मटण आणि चिकन खरेदीसाठी गर्दी केली.

कोट्यवधींचे नुकसान

दोन आठवड्यांपासून चिकनची विक्री सुरू झाली. पहिल्या आठवड्यात कोंबड्यांची मागणी कमी असल्याने भाव वाढले होते. त्यामुळे अनेकांनी मागणी वाढणार हे लक्षात घेऊन कोंबडीची लहान पिले खरेदी केली. हॉटेल्स, लहान मोठ्या पार्ट्या आणि कार्यक्रम बंद असल्याने कोंबड्याच्या चिकनाची मागणी नाही. अनेक भागांत अद्यापही दुकाने उघडलेली नाहीत. त्यामुळे पोल्ट्री फार्म उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून अनेकांची आर्थिक घडीच विस्कटली आहे.
सुधीर दुद्दलवार, कार्यकारी संचालक, माफसू

केवळ घरगुती मागणी

मागील आठवड्यापासून दुकान सुरू केले. पहिल्या आठवड्यापेक्षा आज ग्राहकांनी चिकन खरेदीसाठी अधिक गर्दी केली. आमच्या दुकानांतून हॉटेल्स आणि काही पार्ट्यांसाठी मटण आणि चिकन मोठ्या प्रमाणात विकण्यात येत होते. गेल्या 42 दिवसांपासून हॉटेल्स आणि पार्ट्या बंद आहेत. त्यामुळे विक्री 70 टक्‍क्‍यांनी कमी झाली. किरकोळ घरगुती ग्राहकांकडून मटण आणि चिकनची मागणी वाढल्याने दुकानांमध्ये गर्दी दिसत असली तरी ती काही वेळापुरती असते.
अशरफ सुलेमान, चिकन विक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याची घौडदौड सुरूच! भावात सलग पाचव्या दिवशी वाढ, चांदीही महागली; तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा भाव? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी पहिल्या ३० उमदेवारांची यादी काँग्रेसकडून आज प्रसिद्ध होण्याची शक्यता

Gujarat Earthquake Today : पहाटे गुजरात हादरलं; कच्छ भागात भूकंपाचे धक्के, भूकंपशास्त्र विभागाची माहिती

कोणाचा काडीमोड, तर कोणाचं लग्न तुटलं, 2025 मध्ये 'या' सेलिब्रेटींच्या नात्याता आली मोठी दरी

Prakash Ambedkar: हिंदू मतदारांनी काँग्रेस पक्षाला सोडलंय: ॲड. प्रकाश आंबेडकर, भाजप सोडून युती करण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT