There is no labor for saving cotton 
नागपूर

कापसाची वेचणी करण्यासाठी मजूर मिळेना; प्रती किलोमागे आठ ते दहा रुपये दर

सतीश दहाट

कामठी (जि. नागपूर) : परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या शेतात शिल्लक राहिलेल्या कपाशीचे पीक हाती मिळेल, अशी शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे. मात्र, कापसाची वेचणी करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.

हवामान खात्याने यावर्षी पाऊस चांगला होण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे खरिपाच्या नियोजनात तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशीच्या परणीला पसंती दिली. तालुक्यातील कपाशीचा पेरा दरवर्षीच्या तुलनेत वाढला होता.

मात्र, परतीच्या पावसाने घरात येणारे सोयाबीन शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाले. काही प्रमाणात शेतात शिल्लक राहिलेले सोयाबीन घरात आणण्यासाठी तसेच कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

कापसाची वेचणी केली नाही, तर प्रतवारी खराब होते. त्याचा प्रत्यक्ष परिणाम कापसाच्या भावावर होतो. वेळेवर कपाशीची वेचणी झाली, तर अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. मात्र, पैसे देऊनसुध्दा मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी गतवर्षी पाच ते सहा रुपये प्रती किलो दराने कपाशीची वेचणी केली होती.

मात्र, यावर्षी वेचणीचा दर दुप्पट झाला आहे. यंदा आठ ते दहा रुपये प्रती किलोमागे शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे. यानंतरही मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

पांढरे सोने काळे होण्याच्या मार्गावर

वेचणीला मजूर मिळत नसल्याने पांढरे सोने झाडालाच काळे होण्यात जमा आहे. कापूस खराब झाला, तर योग्य भाव मिळत नाही. वर्षभराची उलाढाल ज्या शेतातील उत्पन्नावर अवलंबून आहे, असे पांढरे सोने मजूर मिळत नसल्याने डोळयासमोर उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे वर्षभराचे नियोजन कसे करायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

SCROLL FOR NEXT