कोंढाळी : येथे खबरदारी म्हणून मृत निवास परिसर सील केला. त्यावेळी एसडीओ श्रीकांत उंबरकर यांनी भेट दिली.  
नागपूर

होता एक आजार, तपासणीनंतर निघाला दुसराच आजार, मात्र घडले विपरित...

संजय आगरकर


कोंढाळी (जि.नागपूर): मुत्राशयाचा त्रास होता म्हणून स्थानिक शनिचरा पेठ, वार्ड नं.3 येथील कृष्णाजी धर्मे (वय 79) हे उपचारासाठी नागपूरच्या शासकीय रूग्णालयात 4 जुलैपर्यंत उपचार घेत होते. तेथे त्यांची कोविड -19 तपासणी करण्यात आली. ती 7 जुलैला पॉझिटिव्ह आली. उपचारादरम्यान मात्र त्यांचा गुरूवारी मृत्यू झाला. त्यांच्यावर नागपूर येथेच गुरुवारी दुपारी 1 वाजता अंतिम संस्कार पार पडल्याची माहिती स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील येरमल यांनी दिली.

अधिक वाचा : मोबाईलच्या कारणावरून आई रागावल्याने मुलाची आत्महत्या...

संपर्कातील पाच जणांना क्‍वारंटाईन
मृत वयोवृद्ध कृष्णराव धर्मे नागपूर येथे खासगी रुग्णालयात पोटाचा आजार व लघवीच्या आजाराने त्रस्त असल्याने 4 जुलैपासून उपचार घेत होते. प्रत्येक रुग्णाची कोविड 19 चाचणी घेणे अनिवार्य असल्याने त्यात 7 जुलैला पॉझिटिव्ह आले. त्यामुळे त्यांच्या सोबतचे परिवारातील 4 व अन्य अशा पाच संपर्कात आलेल्या व्यक्तींना नागपूरातच क्वांरटाइन करण्यात आले होते.

हेही वाचा : तुम्ही नव्हे तर पब्जी खेळतोय तुमच्या जीवाशी, नागपुरात उघडकीस आली ही घटना...

...तरीही कोंढाळी परिसर सुरक्षित
मृत कोंढाळी येथील असले तरी त्यांना कोविड 19 ची बाधा नागपूरला झाली आहे. मागील आठवड्यात ते नागपूरला पोट व लघवीच्या आजारावर उपचारासाठी गेले होते. कोंढाळी येथे ग्रामपंचायतकडून वारंवार दखल घेतली जात असून फवारणी, सॅनिटायझर, मास्क वाटप आदी कार्यक्रम राबविले जात आहेज. परिसर 7 जुलैला सील केला होता. याबाबत स्थनिक आपत्ती निवारण समिती वेळोवेळी मागोसा घेत असल्याचे उपसरपंच स्वप्नील व्यास यांनी सांगितले.

संपादन : विजयकुमार राउत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT