There will be another Corona laboratory at this university  
नागपूर

आता या विद्यापीठातही होणार कोरोना प्रयोगशाळा...

मंगेश गोमासे

नागपूर  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाप्रमाणे लवकरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातही कोरोना तपासणी प्रयोगशाळेची सुरुवात होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून त्याबाबत हिरवा कंदील मिळाला आहे. आता "एम्स'कडून तपासणी करण्यात आल्यानंतर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची (आयसीएमआर) मान्यता मिळताच प्रयोगशाळा सुरू होण्याच्या मार्ग मोकळा होणार आहे.

कोरोना संक्रमणाच्या काळात मराठवाडा विद्यापीठाने पुढाकार घेत "इन्क्‍युबेशन' केंद्रामध्ये कोरोना तपासणी प्रयोगशाळा तयार केली. आयएमसीआरकडून त्यांना मान्यता मिळताच विद्यापीठात प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. त्यासाठी पाच महिने पाठपुरावा केला. अशाच प्रकारची प्रयोगशाळा नागपूर विद्यापीठातही सुरु व्हावी यासाठी "आयसीएमआर' ला प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यासाठी "एम्स'ने पुढाकार घेतला. प्रयोगशाळेसाठी विद्यापीठाने जागा उपलब्ध करुन देत, पायाभूत सोयी उभारल्या.

आता जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या सोयीबाबत प्रक्रिया सुरू असून जिल्हा प्रशासनाने त्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. यानंतर "एम्स'कडून काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येतील. या नमुन्यांचा तपासणी अहवाल "आयसीएमआर'कडे पाठविण्यात येईल. त्याची गुणवत्ता प्रमाणित होताच प्रयोगाशाळेला मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. येत्या पंधरा दिवस ते महिन्याभरात विद्यापीठात प्रयोगशाळा सुरू होण्याची शक्‍यता आहे.

नागपूरसाठी फायदेशीर


विद्यापीठाचे नवे प्रभारी कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी प्रयोगशाळेसाठी इन्क्‍युबेशन सेंटरचा प्रस्ताव तयार करण्याचे सूचना केल्या आहेत. विद्यापीठाचे तज्ञ प्राध्यापक आणि खाजगी रुग्णालयातील डॉक्‍टर व विशेषज्ज्ञ यांच्या मदतीने सुसज्ज प्रयोगशाळेसाठी प्रस्ताव तयार केला. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून आजाराची चाचणी होण्यात मोठी मदत होणार आहे. मात्र, त्यासाठी सरकारने मान्यता देऊन अन्य सुविधा दिल्यास हे शक्‍य होणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

संपादित : किशोर जामकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

SCROLL FOR NEXT