raILway 
नागपूर

त्या अठ्ठावीस प्रवाशांची गाडी सुटली आणि मग? वाचा यांची संवेदनशीलता

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. तीर्थयात्रेला निघालेल्या भाविकांनाही अशाच अडचणींना सामोरे जावे लागले. भाविकांचा जत्था नागपूर स्थानकावर पोहोचला. दाणापूर एक्‍स्प्रेसने सर्व जण पुढे रवाना होणार होते. पण, गर्दीमुळे 80 पैकी 52 भाविकच गाडीत चढू शकले. उर्वरित 28 प्रवासी राहून गेले. नागपूरकरांनी संवेदनशीलतेचा परिचय देत तहान-भुकेने व्याकूळ झालेल्या या प्रवाशांना खासगी गाड्यांनी घरापर्यंत पोहोचवून देण्याची व्यवस्था केली.

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील 80 भाविकांचा जत्था दहा दिवसांपूर्वी तीर्थयात्रेला निघाला. जगन्नाथपुरी, श्रीसेलम, तिरुपती दर्शनानंतर रामेश्‍वरमला पोहोचला. त्यांना अलाहबादला जायचे होते. त्यांच्या जवळ आरक्षिति रेल्वे तिकीटही होते. मात्र, गाडीच रद्द झाल्याने त्यांनी स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. त्यांनी कोणत्याही गाडीने ते अलाहबादपर्यंत येण्याची सूचना केली. त्यानुसार सर्व जण 12461 कन्याकुमारी-हजरत निजामुद्दीन तिरुक्कुरल एक्‍स्प्रेसने निघाले. ही गाडी वेगळ्या मार्गाने जात असल्याचे लक्षात येताच रविवारी रात्री नागपूर स्थानकावर उतरले. एर्णाकुल्ल्लम-पटना एक्‍स्प्रेसने मिर्झापूरला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सकाळी ही गाडी रेल्वेस्थानकावर आल्यानंतर जत्थ्यातील 80 पैकी 52 प्रवासीच गाडीच चढू शकले. उर्वरित 28 जण बाहेरच राहिले. त्यात प्रामुख्याने वृद्ध व महिलांचा समावेश होता. मिर्झापूरला जाणारी तीच शेवटची गाडी होती. त्यात नातेवाईक आणि आप्तांशी ताटातूट झाल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली. ते रात्रभर उपाशी असल्याने आरपीएफ जवानांनी स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्यातून जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर स्वयंसेवी संस्था व रेल्वे प्रशासनाने नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचवून देण्याच्या दृष्टीने धडपड सुरू केली.

तीन खासगी वाहनचालकांना या कामगिरीसाठी तयार करण्यात आले. स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनी काही रक्कमही जमा केली. पण, चालकांनी लेखी पत्राचा आग्रह धरला. त्यानुसार रेल्वेच्या हेल्पडेक्‍सद्वारे प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यांना कोरोनाशी संबंधित लक्षणे नसल्याचे लेखी पत्र देण्यात आले. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता सर्व जण नागपूरकरांचे आभार मानत रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT