afava. 
नागपूर

बघा, या तिघांनी पसरवली होती अफवा, आता अडकले पोलिसांच्या जाळ्यात

अनिल कांबळे

नागपूर : एका ऑडिओ क्‍लिपद्वारे नागपुरातील कोरोना रुग्णामध्ये वाढ होऊन 50 पेक्षा जास्त कोरोना पेशंट असल्याची एक फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्‍लिप सोशल मीडियावर मोठ्या वेगाने व्हायरल झाली होती. याप्रकरणी सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही क्‍लिप व्हायरल करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. जय गुप्ता (37) अमीत पारधी (38) आणि दिव्यांशू मिश्रा (33) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गेल्या 23 मार्च रोजी व्हाट्‌सअपच्या अनेक गृपवर कोरोना रुग्ण वाढल्या संदर्भातील मोबाईल संभाषणाची व्हिडिओ क्‍लिप व्हायरल झाली होती. हे संभाषण जय गुप्ता आणि अमित पारधी यांच्यातील असल्याचे स्पष्ट झाले होते आणि हे संभाषण दिव्यांशू मिश्रा याने व्हाट्‌सअप गृप वर टाकून व्हायरल केले होते. या क्‍लिपमुळे पॅनिक स्थिती निर्माण झाली होती. या ऑडिओ क्‍लिपची दखल पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे त्यांनी गांभीर्याने घेतली होती. ऑडिओ क्‍लिपमधील माहिती खोटी असून अफवा पसरविणारी असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सायबर क्राईम विभागाने ही क्‍लिप व्हायरल करणाऱ्या तिघांनाही शुक्रवारी सकाळी अटक केली.

पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर चांगलाच वचक निर्माण झाला आहे. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज शुक्रवारी ती कथित ऑडिओ क्‍लिप केवळ अफवा असल्याचे व्हिडिओ जारी करून सांगितले आहे. कुणीही सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवू नका, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे. सोशल मीडियावर अफवा पसरविल्या तर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: दोन दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजारात जोरदार उसळी! कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर्स? पाहा आजचे IPO अपडेट

राज्यात अवयव प्रत्यारोपण झाले दुप्पट; राज्य सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी

Latest Marathi News Live Update : स्वीकृत नगरसेवक पदासाठी एक वर्षाचा फॉर्म्युला; भाजप-शिंदे सेनेत मोठी स्पर्धा

Court News: जिजूने छेड काढली म्हणून गोंधळ; कोर्टात मेहुणीची धक्कादायक कबुली... “ते फक्त स्वप्न होतं!” ७ वर्षांनी एअरफोर्स जवान निर्दोष

भाईजानचं चाहत्यांना गिफ्ट! नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा, सलमान साऊथच्या दोन अभिनेत्रीसोबत दिसणार

SCROLL FOR NEXT