file 
नागपूर

कुटुंबीय निघाले होते लग्नाच्या गाठी जोडायला, पण बालसंरक्षण अधिकाऱ्यांना लागली कुणकुण

सतिश डहाट

कामठी (जि.नागपूर):स्थळः  इमली बाग परिसर. प्रसंग अल्पवयीन मुलीचा विवाह सोमवारी (ता.२८) रोजी सामाजिक रितीरिवाजाप्रमाणे आयोजन. दोन्ही परिवाराची सहमती होती. पण जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांना नेमकी कुणकुण लागली. त्यांनी जिल्हा बालसंरक्षण कक्ष व तालुका बालसंरक्षण समितीचे अध्यक्ष तहसीलदार अरविंद हिंगे तसेच जुने कामठी पोलिस ठाण्याशी समन्वय करून पुढील प्रकार थांबविला.

अधिक वाचाः शिक्षकांनी ‘ऐकावे तरी कोणाचे’, करावे कुणाच्या मनाचे?

मुलीच्या जन्मतारखेचा दाखला मागितला अन्....
कायद्यानुसार १८ वर्षापेक्षा कमी व २१ वर्षापेक्षा वयाने कमी असलेल्या अल्पवयीन मुलांचे विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. कामठी शहरातील इमली बाग परिसरात एका सभागृहात एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत आहे,

याबाबतची गुप्त माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांना मिळाली. त्यानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्पणा कोल्हे यांनी बाल विवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जुनी कामठी पोलिस विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या पथकाने लग्नस्थळी भेट दिली. पथकाला बघून सभागृहात गोंधळ झाला.

वधू मंडळीला मुलीच्या जन्मतारखेचा दाखला मागितला असता त्यांनी सुरवातीला टाळाटाळ केली. परंतू गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितल्याने मुलीच्या वयाचा पुरावा सादर करण्यात आला.

मुलीच्या कागदपत्रावरून मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.या कारवाईत तालुका बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष तहसीलदार अरविंद हिंगे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी अर्पणा कोल्हे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्‍ताक पठाण, बाल संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, पोलिस उपनिरीक्षक कल्पना कटारे, सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा सोनटक्के, पोलिस कर्मचारी मंगला बोबडे, दुर्गा भगत, प्रियंका रंभाते, निशा दोलदे, सुरक्षा गणवीर यांनी सहभाग घेतला


अधिक वाचाः आरोग्यमंत्री महोदय, नाही बेड; नाही खासगीत उपचाराची क्षमता, आता तुम्हीच बघा...

असे केले समुपदेशन
तालुका बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष तहसीलदार अरविंद हिंगे बाल विवाह प्रतिबंध कायद्याविषयी माहिती दिली व मुलीचे आईवडिलांचे समुपदेशन केले. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही, याचे हमीपत्र घेण्यात आले.

होणारा बाल विवाह थांबविण्यात आला.  लग्न झाल्यास बाल विवाह प्रतिबंध कायदा २००६ अंतर्गत वर व वधूकडील मंडळी, लग्नात सहभागी होणारे, पाहुणे, लग्नात सहभागी होणारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या सगळ्यावर कारवाही होईल, अशी लेखी स्वरूपात माहिती देण्यात आली.

बालविवाह होणाऱ्या अल्पवयीन मुलीला बाल कल्याण समिती समक्ष काळजी व संरक्षणाची काळजीकरिता उपस्थित ठेवण्याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी पोलिस ठाण्यात पत्र दिले. मागील जुलै महिन्यात जे.पी.नगर भागात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला होता. दोन महिन्यात कामठी शहरात सलग दोन बालविवाह होण्यापासून थांबविले, हे विशेष.

संपादनः विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT