medicle
medicle 
नागपूर

मेडिकलच्या आवारात सुरू होता दारू पिऊन धिंगाणा! तेवढ्यात...

केवल जीवनतारे

नागपूर : आशिया खंडातील सर्वात मोठे शासकीय वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल). दोनशे दहा एकर परिसरात पसरलेले.
रविवारी मध्यरात्रीनंतर येथील मेडिकलच्या मोकळ्या आवारात बाहेरच्या काही व्यक्तींनी "कार' उभी केली. कारवर दारूच्या बाटल्या ठेवल्या. आणि मद्यपार्टी सुरू केली. हा धक्कादायक प्रकार दिसून येताच येथील निवासी डॉक्‍टरांनी त्यांना रंगेहात पकडले. या झटापटीत सारे पळाले, मात्र एकाला पकडण्यात निवासी डॉक्‍टरांना यश आले. मद्यपीचे नाव सुभाष पडोळे असे आहे. तो दुर्गानगर येथील रहिवासी आहे.

मेडिकलच्या आवारातून सुपर स्पेशालीटी हॉस्पिटलच्या दिशेने जाताना मोकळी जागा आहे. या जागेत काही व्यक्ती कारची दारं खुली ठेवून गाणी वाजवत होते. कारवर दारुची बाटल्या होत्या. मोठ्या आवाजातील गाणे ऐकून निवासी डॉक्‍टर संकेत वाढवकर आणि अर्पित धकाते व त्यांचे सहकारी तेथे पोहचले. तेव्हा पटांगणात त्या व्यक्ती मद्यपार्टीत गुंग झाल्या होत्या. कोणीतरी येत असल्याने त्यांनी पार्टी गुंडाळण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढ्या वेळात मेडिकलमधील महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांना सूचना मिळाली होती. तातडीने सर्वांनी मिळून या दारुड्यांना बदडले. इतर दोघे पसार झाले. यातील एकाला पकडण्यात यश आले.

सविस्तर वाचा - महापौर संदीप जोशींचा गौप्यस्फोट, म्हणाले आम्हाला 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचे कारस्थान

अजनी पोलिसांच्या स्वाधीन
मेडिकलच्या इतर निवासी डॉक्‍टरांसह अधिकाऱ्यांना मद्यपार्टीची माहिती कळताच त्यांनी तेथे धाव घेतली. पकडण्यात आलेल्या मद्यपीला पकडून महाराष्ट्र सुरक्षा बलच्या कार्यालयात आणण्यात आले आणि विचारपूस करण्यात आली. सुभाष पडोळे असे नाव मद्यपीने सांगितले. कोणीही यावे आणि मेडिकलच्या आवारात मद्यपार्टी करावी यामुळे मेडिकलची प्रतिमा मलिन होत आहे. या व्यक्तीला अजनी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांकडून या व्यक्तीवर कोणती कारवाई झाली, हे मात्र उशीरापर्यंत कळू शकले नाही.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT