abc 
नागपूर

दवाखान्यात रुग्णांचे पैसेही नाहीत सुरक्षित; तब्बल दीड लाखांवर डल्ला  

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पतीला उपचारासाठी नागपुरात घेऊन आलेल्या एका महिलेचे दवाखाना परिसरातून चोरट्यांनी दीड लाख रुपये चोरून नेल्याची घटना स्नेहनगर येथील सरस्वती हॉस्पिटल येथे उघडकीस आली. 

घुग्गुस (जि. चंद्रपूर) येथील अनिल ठाकुरवार हे शिक्षक आहेत. ठाकुरवार यांना मूत्रपिंडाचा त्रास आहे. त्यामुळे १० फेब्रुवारी रोजी पत्नी रजनी आणि भाचा अनुप अरुण वदवलवार (३८) यांच्यासोबत स्नेहनगर येथील सरस्वती हॉस्पिटल येथे उपचारासाठी आले होते. ठाकुरवार यांना दवाखान्यात भरती केल्यानंतर त्यांची पत्नी रजनी या दवाखाना परिसरातच राहत होत्या. 

शनिवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान त्या दवाखाना परिसरात हजर असताना अज्ञात चोरांनी त्यांची बॅग उघडून दीड लाख रुपये असलेली छोटी पर्स चोरून नेली. हा प्रकार रजनी यांच्या लक्षात आला नाही.

रात्री नऊच्या सुमारास औषधीसाठी त्यांना पैसे द्यायचे असल्याने त्यांनी बॅग उघडली असता त्यांना पर्स दिसून आली नाही. संपूर्ण बॅग शोधून काढली परंतु, पर्स मिळाली नाही. पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच एकच गोंधळ उडाला. लगेच त्यांनी प्रतापनगर पोलिस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दवाखाना परिसरातील सीसी फुटेज ताब्यात घेतले असून त्यादिशेने पोलिस तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..! Rohit Sharma लवकरच Netflix च्या चित्रपटात झळकणार? माजी कर्णधारने दिले संकेत...

Khed Karanjavihire road safety: खेंगलेवस्ती परिसरात उघडी विहीर, वाढत्या वाहतुकीत दुर्घटनेचा धोका; प्रशासन व जागा मालक सुस्त

मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Bhandup Hospital MNS Protest : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती, मनसेचा आरोप, कर्मचाऱ्याला मारहाण

Baramati by-election News: बारामती पोटनिवडणूक : कॉंग्रेसची अखेर माघार, आकाश मोरे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला

SCROLL FOR NEXT