Chandrapur Crime sakal
नागपूर

Chandrapur Crime : चोरट्यांनी फोडले न्यायाधीशांचे घर;सोने, चांदीचे दागिने, रोख रकम केली लंपास

शहरातील एका वसाहतीत भाड्याने राहणाऱ्या न्यायाधीशांचे घर चोरट्यांनी फोडले. सर्व कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी हात साफ केला. यावेळी चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने आणि रोख रकम असा हजारो रुपयांचा ऐवज लुटला.

सकाळ वृत्तसेवा

वरोरा : शहरातील एका वसाहतीत भाड्याने राहणाऱ्या न्यायाधीशांचे घर चोरट्यांनी फोडले. सर्व कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी हात साफ केला. यावेळी चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने आणि रोख रकम असा हजारो रुपयांचा ऐवज लुटला. ही घटना शुक्रवारी (ता. २४) उघडकीस आल्यानंतर शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

वरोरा येथे सिनीअर डिव्हिजनचे दिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी म्हणून डी. आर. पठाण हे कार्यरत आहेत. मागील काही महिन्यांपासून पठाण हे आपल्या कुटुंबीयांसह शहरातील ओमशांती नगरातील चंद्रकांत पुसदकर यांच्या घरी किरायाने राहत आहेत. काही दिवसांपूर्वी ते बाहेरगावी गेले होते.

आज सकाळी घरमालक पुसदकर हे पहिल्या माळ्यावर गेले असता पठाण यांच्या घराचे कुलूप तोडलेले दिसले. त्यानंतर पुसदकर यांनी या घटनेची माहिती वरोरा पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरोरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. ठसे तज्ज्ञ, श्वान पथकास पाचारण केले. श्वानपथक चोरी झालेल्या ठिकाणाहून १०० ते १५० मीटर गेल्यानंतर परत आले. घटनास्थळावर जिल्हा गुन्हे शोध पथकही दाखल झाले.

२३ मेच्या रात्री चोरट्यांनी घरात कुणी नसल्याची संधी साधून समोरील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी घरातील बारा ग्राम सोन्याची साखळी, दहा हजार रोख, सौदी अरेबियाचे पाचशे व दोनशे रुपयांचे डॉलर चोरून नेले, अशी माहिती पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli Crime : डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, रामनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल; 37 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी केली अटक

तो फार कमी कार्यक्रमांना यायचा... अदिती द्रविडने सांगितला काका राहुल द्रविडसोबतचा बालपणीचा अनुभव

Latest Marathi News Live Update: ॲग्रीस्टॅकमुळे कापूस खरेदी नोंदणी जलद होणार - जयकुमार रावल

अखेर मृण्मयी देशपांडेच्या ‘मना’चे श्लोक' चित्रपटाचं नाव बदललं; आता 'या' नावाने येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Crop Insurance Scam : विमा कंपनीचा शेतकऱ्यांवर अन्याय; 15 हजार 200 रुपयांच्या हप्त्याला फक्त 5994 रुपये भरपाई

SCROLL FOR NEXT