coronavirus 
नागपूर

उपराजधानीतील कोरोनाबाधिताची मृत्यू संख्या तीन! कोरोनाबाधितांचा आकडा वाढून 171 वर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील कोरोना रुग्णसंख्येत बुधवारी मोठी वाढ झाली आहे. एकाच दिवशी मेयो, मेडिकलमधील प्रयोशाळेतून 9 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.  दक्षिण नागपुरातील पार्वतीनगर येथील एका 22 वर्षीय युवकाचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्यामुळे प्रशासन पुरते हादरले आहे. आतापर्यंत दक्षिण नागपुर कोरोनामुक्त होते. मात्र युवकाच्या मृत्यूनंतर दक्षिण नागपूरही कोरोनाच्या विळख्यात आल्याचे दिसते.  हा युवक किती जणांच्या संपर्कात आला, याची माहिती प्रशासनाच्या हाती लागणे अशक्‍य आहे, यामुळे  पार्वतीनगर हे कोरोनाचे दुसरे हॉट स्पॉट बनण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
शहरात 11 मार्च रोजी पश्‍चिम नागपुरात पहिला कोरोनाबाधित आढळला. यानंतर पुर्व पश्‍चिम, दक्षिण पश्‍चिम, मध्य आणि उत्तर नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत होते, परंतु शहरात कोरोनाने धडक दिल्यानंतर दीड महिना दक्षिण नागपूर सुरक्षित होते. परंतु या युवकाच्या मृत्यूनंतर येथील स्थिती संवेदनशील होणार असल्याची जोरदार चर्चा येथे रंगली आहे. पार्वतीनगरातील युवक मृत्यूच्या दोन दिवसांपुर्वी मेडिकलमध्ये तपासणीसाठी आला होता. परंतु त्याला कोणी गंभीरपणे घेतले नाही, मात्र खबरदारी म्हणून त्याच्या घशातील द्रवाचे नमुने घेण्यात आले होते.

मंगळवारी या युवकाचा मृत्यू झाला आणि बुधवारी मृतक युवक कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला. यामुळे या युवकावर उपचार करणारे डॉक्‍टर, परिचारिकांसह सफाई कामगार यांची शोध मोहीम सुरू झाली आहे. मेडिकलमधील सुमारे पंधरा विस जणांना विलगीकरणात जावे लागेल अशी माहिती सुत्रांनी दिली. कोरोनामुळे या युवकाचा मृत्यू झाला असला तरी अद्याप या मृतकाची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद अधिकृतरित्या प्रशासनाकडून करण्यात आली नाही.

  • दैनिक संशयित : 33
  • एकूण संशयित : 2485
  • सध्या भरती संशयित : 106
  • एकूण भरती संशयित : 1667
  • एकूण भरती कोरोनाबाधित रुग्ण : 102
  • दैनिक तपासणी नमुने : 179
  • एकूण तपासणी नमुने : 4095
  • आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने : 171
  • घरी सोडलेले सकारात्मक रुग्ण : 64
  • घरी सोडलेले संशयित : 1558
  • आज विलगीकरण केलेले संशयित : 00
  • विलगीकरण कक्षात भरती संशयित : 1955
  • विलगीकरण कक्षातून घरी पाठविलेले संशयित  : 37
  • पाठपुरावा सुरू असलेले एकूण संशयित  : 424

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

Gas Cylinder Seized : साठेबाजाकडून १९ गॅस सिलिंडर जप्त; ‘सकाळ’च्या वृत्तानंतर पथकाची धडक कारवाई

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT