कामठी: समाजकंटकांनी रस्त्यावर टाकलेल्या काटया उचलताना ग्रामस्थ.  
नागपूर

कोण रे ते रिकामटेकडे, देवबाभळीच्या काटया रस्त्यांवर टाकणारे ?

सकाळ वृत्तसेवा

कामठी (जि.नागपूर) : गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामपंचायत ते केंद्रशासन प्रत्येक जन आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. लॉकडाऊनच्या या परिस्थितीत डॉक्‍टर, नर्स, पोलिस, शेतकरी, भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, विद्युत कर्मचारी आपला जीव धोक्‍यात घालून सेवा देत आहेत. अशावेळी काहीच न करणारे उपद्रवी समाजकार्य करणा-यांच्या मार्गात अडथळा आणत आहेत. आजनी येथे रस्त्यावर काटे टाकून नागरिकांना अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला.

सामाजिक कार्यकर्त्यांना उपद्रव
रोज वाढणारे रुग्णांचे आकडे आपल्याला दिसत असून यातून या महामारीची भयानकता दिसून येत आहे. पण, तरीसुद्धा काही समाजकंटक या सर्व यंत्रणेला सहकार्य करून घरी बसण्याऐवजी दिवसाढवळ्या भर चौकात ठाण मांडून गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही अतिशय निंदनीय बाब आहे. हीच परिस्थिती कामठी तालुक्‍यातील आजनी गावात असून गावातील ग्रामपंचायततर्फे मास्क वाटप, फवारणी, गावबंदीं करण्यात आली असून ग्रामपंचायत आणि पंचायत समिती सभापती उमेश रडके हे तसेच गावातील काही सुज्ञ नागरिक, कार्यकर्ते गावात विषाणूचा प्रादुर्भाव व्हायला नको म्हणून विशेष काळजी घेत आहेत. गावबंदीसाठी ग्रामपंचायतीने दोन रोजंदारसुध्दा ठेवलेले आहेत. चौकात बसण्यास बंदी करण्यात आली असली तरी अनेक जण हमखास तिथे बसलेले आढळतात. त्यावर प्रतिबंध म्हणून ग्रामपंचायतीने बसण्याच्या स्थळी काळे लावले तरी हे रिकामटेकडे त्या ठिकाणी जाऊन बसायचे. कधी कधी एखाद चक्कर मारणाऱ्या पोलिसांना ते हुलकावणी देतात. त्यामुळे पोलिसांनी रोज दोनदा तरी चक्कर मारावे, अशी मागणी गावातून होत आहे. गावातील बाजारही बंद करण्यात आलेला आहे.

समाजकार्यकर्त्यांनी वेचल्या काटया
या काट्या देवबाभळीच्या असून त्या जिल्हा परिषद शाळेसमोर, लीलाधर दवंडे, गजेंद्र वाठ, माजी सरपंच तुकाराम लायबर, सुधाकर सुरस्कार, हरिशंद्र जेवडे या कुटुंबाच्या येण्या-जाण्याच्या वाटेवर टाकण्यात आल्या. कुणाला दवाखान्यात जायचे असले, पाणी आणण्यास जायचे असले, किराणा आणण्यास जायचे असले तर कसे जायचे? हा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केल्यानंतर या काट्या ग्रामपंचायत कर्मचारी व स्वतः सभापती रडके यांच्यासह लीलाधर दवंडे यांनी वेचल्या आहेत. गाव सुरक्षेसाठी सहकार्य न करणाऱ्या अशा उपद्रवींचा जाहीररित्या निषेध करत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT