file photo 
नागपूर

त्या' कर्मचाऱ्यांची होणार चौकशी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लाचप्रकरणात एसीबीने ताब्यात घेतलेले जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांची काही कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन फाईल्स दिल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणीची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सीईओ योगेश कुंभेजकर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. यामुळे टाकळीकरांची भेट घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. काहींनी तर चक्क स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारल्याची चर्चा आहे. 
कामाचे बिल काढण्यासाठी कंत्राटदाराला सहा लाखांची मागणी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता टाकळीकर यांनी केली. संबंधित कंत्राटदाराने याची एसीबीकडे तक्रार केली. पहिला टप्प्यात दोन लाख रुपये त्यांनी स्वीकारले. या लाच प्रकरणी एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली.

त्यांच्याघरूनही 15 लाख रुपयांचे सोने मिळाले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. कर्मचारी त्यांच्याकडे फाईल्स घेवून गेले. या फाईल्स त्यांनी हाताळल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद आणि इतर दुसऱ्या विभागातील सीसीटीव्ही कॅमेरात ही बाब कैद झाल्याची चर्चा आहे. सर्व कर्मचाऱ्यांरी टाकळीकर यांच्या मर्जीतील असल्याचे सांगण्यात येते. हे वृत्त माध्यमांमध्ये प्रकाशित होताच संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. पगार बिलसह इतर काही फाईल्स त्यांच्याकडे असल्याचे समजते. पाणी पुरवठा विभागाचे पगार बिलाची फाईला आली किंवा नाही याबाबत माहिती घेवून सांगतो, असे वित्त लेखा अधिकारी प्रिया तेलकुठे यांनी सांगितले. तर सीईओ योगेश कुंभेजकर यांनी संपूर्ण प्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. 

 सर्व फाईल्स मागविण्यात आल्यात
एसीबीच्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून त्यांच्यावर विजय टाकळीकरांवर कारवाई होईल. त्यानंतरच आमच्याकडून आवश्‍यक कार्यवाही करण्यात येईल. या प्रकरणाशी संबंधित सर्व फाईल्स मागविण्यात आल्यात. 
योगेश कुंभेजकर, सीईओ, जि.प. 


प्रभारामुळे अडकले काम 
टाकळीकरांवरील कारवाईनंतर कार्यकारी अभियंत्यांचा प्रभार कुणाचकडे देण्यात आला नाही. यामुळे विभागातील अनेक कामे रखडल्याचे सांगण्यात येते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

Pune Kolhapur Highway Traffic : गणेशोत्सवाच्या गर्दीने खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी; पाच तासांचा प्रवास दहा तासांवर

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! सांगलीतील ४ हजार ९९ लाभार्थ्यांची दुसरी कर्जमाफी यादी प्रसिद्ध

Marathi News Live Updates : जांभूळवाडी दरी पुलावर मध्यरात्री भीषण अपघात; चारचाकीचा चक्काचूर, ट्रक पलटी

SCROLL FOR NEXT