thousands of awakenings have not received honorarium In forty five years 
नागपूर

४५ वर्षांत हजारो प्रबोधन, मिळाले नाही मानधन; ६९ वर्षीय शाहीर शिवशंकर यांची व्यथा

दिलीप चव्हाण

मांढळ (जि. नागपूर) : कुही तालुक्यातील आकोली येथील ६९ वर्षीय शाहीर शिवशंकर डोमाजी गजभिये हे वयाच्या २५ व्या वर्षांपासून समाजप्रबोधनाचे कार्य करतात. मात्र, कलावंतांना मिळणाऱ्या मानधनापासून ते अद्यापही वंचित असल्याची खंत ‘सकाळ’ प्रतिनिधीजवळ व्यक्त केली.

कुहीजवळच्या रेल्वेफाटकाजवळ असलेले आकोली या गावी २ एप्रिल १९५१ रोजी शाहीर शिवशंकर यांचा जन्म झाला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धम्मदीक्षा सोहळा त्यांनी वडिलांच्या खांद्यावर बसून बघितल्याचे ते सांगतात. बेताची परिस्थिती असूनसुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून पदवीपर्यंतचे शिक्षण शाहीर शिवशंकर यांनी नागपुरातून पूर्ण केले.

गायनाची आवड असल्याने गुरू दामाजी गजभिये यांच्या मार्गदर्शनात भजनमंडळ तयार केले. त्या माध्यमातून गावोगावी जाऊन छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज आदी महामानावांच्या विचारांचा प्रचार व प्रसार ते गेल्या ४५ वर्षांपासून करीत आहेत.

स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबळी कायदा, दारुबंदी, महात्मा गांधी तंटामुक्त गाव आदी सरकारच्या उपक्रमाचा प्रसार व प्रचार ते गीतगायंनाच्या माध्यमातून करीत आहेत. विदर्भात खेड्यात जाऊन हे कार्य अविरतपणे करीत आहेत. बुद्ध जयंती, भीमजयंती, शिवाजी महाराज जयंती, महात्मा गांधी जयंती, गोपाळकाला, भागवत सप्ताह अशा प्रसंगी ते समाजप्रबोधन करतात. त्यांच्या गायन कलेचे कौतुक करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संगीत पुरस्कार, विदर्भ कलाकार परिषद पुरस्कार, महाराष्ट्र लोकशाहीर परिषदेचा पुरस्कार असे दोनशेपेक्षा जास्त पुरस्कार त्यांना आतापर्यंत मिळालेले आहेत.

माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, खासदार कृपाल तुमाणे, माजी आमदार सुधीर पारवे, जिल्हा परिषदेतर्फे प्रशस्तीपत्र देऊन या शाहीर कलावंताचा सन्मान केला आहे. एवढेच नव्हे तर शाहीर शिवशंकर यांनी ३० वर्षे कुही पोलिस ठाण्यात होमगार्ड म्हणून सेवा दिली. आता त्यांच्याकडून उतारवयात एक रुपयाही मिळत नसल्याची तीव्र नाराजी शिवशंकर गजभिये यांच्या मनात आहे.

सरकारकडून मानधन मिळावे
४५ वर्षे गायन कलेच्या माध्यामातून समाजप्रबोधन केले. तसेच समाजातील लग्नविधी लावण्याचे कार्यही केले. आता वयाच्या उत्तरार्धात सरकारकडून मानधन मिळावे म्हणून चारवेळा सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन, विस्तार भवन मुंबई यांच्याकडे कागजपत्रांसह अर्ज केलेत. मात्र, काहीही उपयोग झाला नाही.
- शाहीर शिवशंकर

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL ची कॉपी करायला गेले अन् पाकडे तोंडावर आपटले; कवडी भावात विकली गेली PSL मधील हैदराबाद फ्रँचायझी, रिषभ-श्रेयस मिळून एवढे कमावतात...

BJP: भाजप नेत्याचा रहस्यमयी मृत्यू; रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, कुटुंबाने दिली धक्कादायक माहिती

Fact Check : एलिसे पेरीने लाईव्ह सामन्यात बाबर आझमला केलं प्रपोज? BBL सामन्यात नेमकं काय घडलं?

'चला काहीतरी चांगलं पहायला मिळणार...' समरचा भूतकाळ स्वानंदीला कळणार! आजीला विश्वासात घेऊन स्वानंदी घरातल्यांचं सत्य समोर आणणार

Bank Loan EMI: दिलासादायक बातमी! गृह आणि कार कर्जाच्या ईएमआयवर मोठी सवलत मिळणार; 'या' बँकेची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT