https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/six-corona-positive-found-nagpur-city-278966 
नागपूर

तिघांच्या मृत्यूने उपराजधानीची चिंता वाढली, ... तर स्थिती बिघडण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दर दोन दिवसानंतर कोरोना संशयिताचा मृत्यू होत आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. गुरुवारी (ता. 9) उपराजधानीत कोरोनासदृश लक्षणे आढळून आलेल्या तिघांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष असे की, 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याशिवाय 58 वर्षांच्या व्यक्तीसह मेयोच्या वॉर्ड क्रमांक सातमध्ये चाळिशीतील एकजण दगावला आहे. या तीन मृत्यूंची माहिती मिळताच प्रशासन हादरले आहे. यातील एखादा कोरोनाबाधित आढळल्यास स्थिती बिघडण्याची शक्‍यता आहे. 

मेडिकलमधील चिमुकल्या 12 वर्षांच्या मुलासह 58 वर्षीय व्यक्तीचे तसेच मेयोतील एका व्यक्तीचा मृतदेह कोरोना चाचणीचा अहवाल येईपर्यंत नातेवाइकांच्या स्वाधीन करता येणार नाही. कोरोनाचा अहवाल आल्यानंतरच तिन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तोपर्यंत मेडिकल आणि मेयोच्या शवविच्छेदन विभागात चार पदरी प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून वेगळे ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती मिळाली आहे. 

मेडिकलमध्ये दगावलेल्या 12 वर्षीय मुलाला श्‍वास घेण्यास कठीण झाले होते. सोबतच सर्दी, खोकला आणि ताप होता. ही कोरोनाची लक्षणे आहेत. या मुलाला नातेवाइकांनी सुरुवातीला मेयोत उपचारासाठी नेले होते. त्यानंतर सहा एप्रिलला मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले. उपचारादरम्यान गुरुवारी या मुलाचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे 58 वर्षीय व्यक्तीलाही मेयोतून गुरुवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास मेडिकलमध्ये उपचारासाठी रेफर करण्यात आले होते. त्याचाही गुरुवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

अहवालानंतरच अंत्यसंस्कार

मेयो रुग्णालयातील कोरोना संशयितांसाठी वॉर्ड क्रमांक सात तयार करण्यात आला आहे. या वॉर्डात पंचवीसपेक्षा अधिक संशयित कोरोनाबाधित दाखल आहेत. गुरुवारी या वॉर्डात दुपारी एक जण दगावला. त्याला कोरोनाची लक्षणे होती. दरम्यान, मेडिकलमधील दोघे आणि मेयोतील एक अशा तिघांच्या घशातील द्रव्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीला पाठविण्यात आले आहेत. अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल व त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT