नागपूर

बुरशीचे आणखी ३ बळी; नागपूर जिल्ह्यात मृत्यूसंख्या पोहोचली ८५ वर

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनाप्रमाणेच म्युकरमायकोसिसचे भय (Fear of mucomycosis, similar to corona) दिवसेंदिवस वाढत आहे. नागपूर शहरात शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत २४ तासांत म्युकरमायकोसिस अर्थात बुरशीच्या आजाराने तीन जणांचा बळी (Three died of mucormycosis infection) घेतला आहे. २६ नवीन बुरशीचे रुग्ण आढळले (26 new patients were found) आहेत. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील आजपर्यंतच्या या बुरशीच्या आजाराने ८५ जणांचे जीव घेतले आहेत. (Three-died-of-mucormycosis-infection-in-Nagpur-district)

नागपुरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत आहे. मात्र, तुलनेत म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी रेमडेसिव्हिरचा काळाबाजार होत असल्याचे पुढे आले. तर म्युकरमायकोसिसवर आवश्यक असलेले अँटी-फंगल इंजेक्शन ‘अम्फोटेरिसिन-बी’चा तुटवडा निर्माण झाला आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून इंजेक्शनचे शासकीय व खासगी रुग्णालयांना वितरण केले जात आहे.

रविवारी दिवसभरात शासकीय रुग्णालयांत ८, खासगी रुग्णालयांत १८ असे एकूण २६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. नागपूर जिल्ह्यातील या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या १ हजार १३२ झाली आहे. खासगी रुग्णालयांतील तीन मृत्यूमुळे येथे या आजाराचे मृत्यूही वाढत आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांतील ५८५ रुग्णांवर आजपर्यंत शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ३०० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली गेली आहे. तर सध्या विविध ६४ खासगी व काही शासकीय रुग्णालयांमध्ये ६१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ३३७ रुग्ण शासकीय रुग्णालयांत तर २८१ रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

(Three-died-of-mucormycosis-infection-in-Nagpur-district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Bhaiyya Mane : ‘आजपासून भैय्या मानेंचा संबंध संपला,’ ४० वर्षे एकत्र असलेल्या भैय्या मानेंवर हसन मुश्रीफांची आगपाखड, भैय्या मानेंचाही पलटवार

IND vs WI : गिल-विराट स्वस्तात बाद, पण रोहित शर्माने केला वर्ल्ड रेकॉर्ड; सचिन तेंडुलकरला टाकले मागे

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

Sugar Mill Opening : साखर कारखाने सुरु करण्यासंदर्भातील राजु शेट्टींची मागणीची मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडुन पाठराखण

लेट पण थेट! 'या' मुलांकाला जन्मलेल्या लोकांचे उशिरा होतात लग्न, लाईफ पार्टनर असा मिळतो की...

SCROLL FOR NEXT