खापरखेडाः किल्लेकोलार परिसरात मोक्षधाम परिसरात कोलार नदीत बुडालेल्या युवकांचा शोध घेताना रेस्क्यू चमू
खापरखेडाः किल्लेकोलार परिसरात मोक्षधाम परिसरात कोलार नदीत बुडालेल्या युवकांचा शोध घेताना रेस्क्यू चमू 
नागपूर

तिघे मित्र गेले आजीच्या अस्थिविसर्जनासाठी, मात्र घडले काळजाचा थरकाप उडविणारे

दिलीप गजभिये

खापरखेडा/कामठी (जि.नागपूर): आजीच्या निधनानंतर तिच्या अस्थिविसर्जनासाठी जिल्ह्यातील किल्लेकोलार येथे तिघे जिवश्‍च कंठश्‍य मित्र नागपूरवरून मोठ्या उत्साहात सकाळीच निघून गेले. अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम आता संपणारच म्हणून ते कोलार नदीच्या पाण्यात उतरले. त्यातील एकाला पाण्यात उतरून पोहण्याची इच्छा झाली. त्याने पाण्यात उडी घेतली. मात्र ज्याची अखेर भीती होती, तेच घडले.

 बाबूरखेडा नागपूर येथील एका वृद्धेच्या अस्थिविसर्जनाकरीता आलेले तरुण अंघोळीला गेले असताना मित्राला वाचवित असताना दोन तरुण वाहून गेल्याची घटना स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत किल्ले-कोलार नांदा कोराडी परिसरात घडली. सायंकाळच्या सुमारास शोधमोहीम सुरू असताना दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले तर एका तरुणाचा शोध एनडीआरएफची तुकडी घेत आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार बुडालेल्या तरुणांची नावे शंतनू उर्फ नयन कैलास येडकर (वय२०,नवीन बाबूरखेडा नागपूर), हर्षित राजू येदवान (वय२०,लाकडीपूल नागपूर), आकाश राजेंद्र राऊत (वय२५, रामेश्वरी नागपूर) अशी आहेत. सुमित बंडू सरवदे (वय२५, रा.नवीन बाबूरखेडा नागपूर) यांची आजी लहानूबाई सदाशिव सरवदे(वय ८२) हिचे दोन  दिवसापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे  शनिवारी लहानुबाईच्या स्थिविसर्जनाचा कार्यक्रम किले कोलार (नांदा कोराडी) येथे आयोजित करण्यात आला होता.

डोह असल्याचा आला नाही अंदाज
अस्थिविसर्जन कार्यक्रमाला लहानुबाईचा नातू फिर्यादी सुमित बंडू सरवदे व त्याचे मित्र शंतनू उर्फ नयन कैलाश येडकर, हर्षित राजू येदवान, आकाश राजेंद्र राऊत यांच्यासह ८ ते १० नातेवाईक अस्थिविसर्जन कार्यक्रमाकरिता किले-कोलार नांदा कोराडी येथे आले होते. दुपारी दोनच्या सुमारास लहानुबाईच्या अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कोलार नदीच्या पात्रावर शंतनू,  हर्षित व आकाश हे तिन्ही मित्र अंघोळीसाठी गेले होते. शंतनू अंघोळीसाठी पाण्यात उतरला असताना त्याठिकाणी डोह असल्यामुळे त्याला अंदाज आला नाही. पाण्यात डुबकी घेताच शंतनू वाहू लागला. शंतनू पाण्यात गटांगळ्या खात असताना त्याला वाचविण्यासाठी आकाशने उडी घेतली. मात्र तोसुद्धा वाहून जाऊ लागला. त्यामुळे शंतनू व आकाशला वाचवण्यासाठी हर्षिने पाण्यात उडी घेतली. मात्र तिघेही वाहून गेले. ही माहिती सुमित व त्याच्या नातेवाईकांना कळली. घटनेची माहिती खापरखेडा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. एनडीआरएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आले. एनडीआरएफच्या तुकडीने बराच शोध घेतल्यानंतर आकाश व शंतनूचा मृतदेह आढळून आला, तर हर्षितच्या मृतदेहाचा तपास सुरू आहे.
अधिक वाचाः मानोऱ्यात चितळाच्या शिकारीची बोंबाबोंब, मात्र निघाले कोंबडीचे मांस


अंघोळ करण्यापासून का रोखले नाही?
आकाश हा आई-वडिलांना एकुलता एक होता. तो वडिलांना सांगून आज सकाळी दहाच्या सुमारास राख विसर्जनासाठी जातो म्हणून मित्रासोबत निघून गेला. यावेळी मुलाला वडिलानेच बर्मुडा व टीशर्ट पॅक करून दिले. ते तो सोबत घेऊन गेला. घरची परिस्थिती फार बेताची आहे. आकाशचे वडील घरीच टेलरींगचे काम करतात. आकाश हा कॅटरींगचे काम करीत होता. तो रामेश्वरी येथे किरायाच्या घरी राहत होता .
घटनास्थळी बघ्यांनी व नातेवाइकांनी एकच गर्दी करुन काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण केले होते. आकाशच्या परिजनांनी ज्यांच्या घरचा राख विसर्जनाचा कार्यक्रम होता, त्यांचाशी या  घटनेवरून वाद घालून खोलगट भागात अंघोळीसाठी जाण्यास का रोखले नाही, असा सवाल केला.

संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT