Three killed in lightning strike in Heavy rain at Nagpur Rural  Three killed in lightning strike in Heavy rain at Nagpur Rural
नागपूर

तिघांचा मृत्यू; एकाचे १० दिवसांपूर्वी तर दुसऱ्याचे ५ महिन्यांपूर्वी झाले लग्न

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : जिल्ह्यात शनिवारी (ता. १८) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. विजेचा कडकडाटही झाला. तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून नरखेड तालुक्यातील तिघांना (killed) जीव गमवावा लागला. तसेच दोन बैलही दगावले. पहिल्याच पावसात शेतकऱ्यांवर संकट कोसळल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अजून पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही आणि तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. (Three killed in lightning strike in Heavy rain at Nagpur Rural)

प्राप्त माहितीनुसार, पहिल्या घटनेत योगेश रमेश पाठे (२७, रा. हिवरमठ) हा तरुण शेतकरी दुपारी शेतात पेरणी करीत होता. दरम्यान, पाऊस सुरू झाला. योगेश घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ पोहोचला. तेवढ्यात वीज त्याच्या अंगावर पडली. यात त्याचा जागीच मृत्यू (killed) झाला. योगेशचे १० दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. त्याला वडील नाही. मोठा भाऊ व आई सोबत तो राहत होता. त्याच्याकडे ५ एकर शेती आहे.

दुसऱ्या घटनेत, मुक्तापूर शिवारात शेतातील झोपडीत दोन शेतकरी बसले होते. दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पाऊस आल्याने दोघेही झोपडीतच थांबले. झोपडीवर वीज (lightning strike) पडल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. दिनेश ज्ञानेश्वर कामडी (वय ३४) व बाबाराव मुकाजी इंगळे (६०) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही मुक्तापूर येथील रहिवासी होते.

मृत दिनेश कामडीचे पाच महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. बराच वेळ झाल्यानंतरही दिनेश घरी न आल्याने वडील शेतात पाहायला गेले. तेव्हा दोघेही शेतातील झोपडीत पडलेले दिसले. दोघेही प्रतिसाद देत नसल्याने वडिलांनी याची माहिती गावातील नागरिकांना दिली. यानंतर दिनेश आणि बाबाराव यांचा वीज पडून मृत्यू झाल्याचे लक्षात आले.

तिसऱ्या घटनेत, पिपंळगाव (राऊत) शिवारमध्ये भिष्णूर येथील शेतकरी सुनील तानबा कळंबे यांच्या शेतात दुपारच्या सुमारास वीज पडून बैलजोडीचा मृत्यू झाला. तसेच चौथ्या घटनेत रामटेक तालुक्यातील बोरडा (सराखा) येथे वीज पडून दोन म्हशींचा मृत्यू झाला. मृत म्हशी सीताराम तोंडरे यांच्या आहेत. सीताराम यांनी सकाळी म्हशी चारून झाडाखाली बांधल्या होत्या. मात्र, वीज पडल्याने त्यांचा मृत्यू (killed) झाला.

पाठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

तिन्ही ठिकाणच्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार मनोज चौधरी सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीयतपासणीसाठी शवविच्छेदन गृहात पाठवले. पहिल्याच पावसात तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या योगेशच्या मृत्यूने पाठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT