New criminal laws in India: Sakal
नागपूर

New Criminal Laws In India: नव्या कायद्यांमुळे वाढणार पोलिसांची जबाबदारी; आजपासून होणार सर्वत्र अंमलबजावणी

Police Responsibility of New criminal laws : नव्या कायद्यांतर्गत पोलिसांची जबाबदारीही वाढणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : इंग्रज काळापासून लागू असलेले कायदे, नियम हटवून त्याऐवजी आजच्या काळात लागू पडतील असे नियम, कायदे, अटी, तरतुदींच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने फौजदारीसंदर्भातील तीन नवीन कायदे १ जुलै २०२४ पासून लागू होत आहेत.

भारतीय दंड संहिता १८६० ऐवजी ‘भारतीय न्याय संहिता २०२३’, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ ऐवजी ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’ आणि भारतीय पुरावा कायदा १८७२ ऐवजी ‘भारतीय साक्ष अधिनियम २०२३’ अशी या कायद्यांची बदललेली नावे आहेत. नव्या कायद्यांतर्गत पोलिसांची जबाबदारीही वाढणार आहे.

काय आहेत तरतुदी

भारतीय न्याय संहिता २०२३

  • बालक याचा अर्थ १८ वर्षांखालील कोणतीही व्यक्ती असा आहे.

  • जेंडर हे सर्वनाम जिथे जिथे वापरले असेल त्यात पुरुष व स्त्रीसोबत तृतीयपंथी यांचा समावेश केला आहे. तृतीयपंथी तक्रार करण्यास आल्यास तो सांगेल (स्वतःला स्त्री किंवा पुरुष) त्याप्रमाणे तक्रार घ्यावी.

  • अपराध करण्यासाठी बालकाला भाड्याने घेणे, कामावर ठेवणे त्याला द्रव्यदंडासह १० वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद.

  • पाच किंवा अधिक व्यक्तींच्या जमावाने एकत्र येऊन धर्म, वंश, जात, जनसमाज, भाषा, लिंग, वैयक्तिक विश्वास आणि इतर तत्सम कारणांवरून खून घडवून आणल्यास मृत्यू किंवा आजन्म कारावासाची शिक्षा आणि द्रव्यदंड देण्यात येईल.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३

  • सात वर्षे किंवा त्याहून कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपीस अटक करणे आवश्यक असल्यास तपास अधिकारी किंवा अंमलदार यांनी खात्री करून सबळ कारणांवरून आरोपीस अटक करावी.

  • आरोपीस त्याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची, जामिनाच्या हक्काची तसेच अटकेच्या कारणांची माहिती देण्यात यावी.

  • अटक केलेल्या व्यक्तीच्या अटकेबाबत त्याचे नातेवाईक किंवा मित्र यांना माहिती देणे तपास अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे.

  • आरोपीला अटक करताना अंगझडतीच्या वेळी त्याच्याजवळ घातक हत्यारे मिळाल्यास ती जप्त करून त्याबाबतचा अहवाल तातडीने न्यायालयास सादर करणे आवश्यक आहे.

  • महिला आरोपीस महिला पोलिस अधिकारी, अंमलदार यांच्या उपस्थितीत अटक करणे बंधनकारक आहे.

भारतीय साक्ष अधिनियम २०२३

  • पीडित महिला तात्पुरती किंवा कायमस्वरूपी मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग असेल तर अशा पीडितेचे निवासस्थान किंवा तिच्या पसंतीच्या ठिकाणी जाऊन विशेष शिक्षण देणाऱ्याच्या उपस्थितीत महिला अधिकाऱ्यांनी फिर्यादीचा जबाब नोंदवणे. नसल्यास त्याची सविस्तक कारणे नमूद करणे.

  • पीडित अल्पवयीन असल्यास वयाचा उल्लेख, तिचा जन्म दाखला, शाळेचा दाखला प्राप्त करून तिच्या वयाची खात्री करणे.

  • आरोपी ज्ञात असल्यास त्याचे नाव, पत्ता व इतर तपशील नमूद केला आहे का? आरोपी अनोळखी असल्याचे त्याचे परिपूर्ण वर्णन घेऊन ‘त्याला मी परत पाहिले तर ओळखेन’ असा उल्लेख फिर्यादीत केला आहे का? हे पाहणे.

  • आरोपी एकापेक्षा जास्त असल्यास प्रथम खबरदारी अहवालात प्रत्येक आरोपीने केलेल्या कृत्याचे सविस्तर वर्णन नमूद केले आहे का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT