उभ्या ट्रेलरला धडक दिल्याने चेंदामेंदा झालेली कार उभ्या ट्रेलरला धडक दिल्याने चेंदामेंदा झालेली कार
नागपूर

उभा ट्रेलर पाहून चालक घाबरला अन् तागडे कुटुंबाला मृत्यूने कवटाळले

सकाळ डिजिटल टीम

कोंढाळी (जि. नागपूर) : रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रेलरला भरधाव कारने जोरदार धडक दिली. यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू (Three people died in car accident) झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील बाजारगावनजीक शनिवारी (ता. १९) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. रोशन रामाजी तागडे (वय २८), राम रोशन तागडे (वय ४ महिने), आचल रोशन तागडे (वय २४) सर्व रा. कळमना, नागपूर अशी मृतांची नावे आहेत. तर जोया आकाश मेश्राम (वय ८) गंभीर जखमी झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारगावनजीकच्या अमरीश ढाब्याजवळ पुण्यावरून कळमेश्वरकडे लोखंडी कॉइल घेऊन जाणारा ट्रेलर चालकाने रस्त्याच्या बाजूला उभा केला होता. दरम्यान, कळमना येथील रोशन रामाजी तागडे हे कोंढाळी येथील लग्नसमारंभ आटोपून कोंढाळीवरून नागपूरकडे कारने जात होते.

अचानक रस्त्यावर उभा असलेला ट्रेलर पाहून रोशन यांचे कारवरील संतुलन (Road Accident) बिघडले. त्यामुळे ट्रेलरच्या मागील भागाला कारची धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की, कारचा चेंदामेंदा झाला. चालक रोशन तागडे व मुलगा राम यांचा जागीच मृत्यू (Three people died in car accident) झाला. तर पत्नी व पुतणी गंभीर जखमी (One seriously injured) झाले. आचल तागडे यांचा नागपूर येथील मेडिकलमध्ये नेले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच कोंढाळी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. राष्ट्रीय महामार्ग मोकळा करून जखमींना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रेलर चालक राजेश ठवरे (वय ४५, रा. नागपूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनात भोजराज तांदूळकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT