Three people left their house in the wake of free fire game In Nagpur 
नागपूर

पब्जी बंद झाले म्हणून काय झालं? ‘फ्री फायर’च्या नादात तिघांनी सोडले घर

अनिल कांबळे

नागपूर : पब्जीप्रमाणेच खेळला जात असलेल्या ‘फ्री फायर’ मोबाईल गेमच्या नादात तीन मित्रांनी नियोजन करून घर सोडले. त्यांनी पहाटे पाच वाजता रेल्वे स्टेशन गाठले आणि मुंबईकडे रवाना झाले. एकाच वस्तीतून तिघेही बेपत्ता झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली. मात्र, ते तिघेही रेल्वेने मुंबईला जात असल्याचे मोबाईल लोकेशनवरून लक्षात आल्यामुळे पालक आणि पोलिसांनीही सुटकेचा निश्‍वास सोडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतापनगरातील त्रिमूर्तीनगरात राहणारे शुभम विजय माने (१५), वेदांत राऊत (१६) आणि आदित्य सिंग (१५) हे तिघेही एकाच वस्तीत राहतात. एकमेकांचे मित्र आहेत. तिघांकडेही स्मार्ट फोन असल्यामुळे मोबाईलमध्ये ‘फ्री फायर’ गेम डाऊनलोड केला होता. तिघेही मोबाईल गेममध्ये नेहमी व्यस्त राहत होते.

पाच दिवसांपासून तिघांच्या एकमेकांशी भेटी वाढल्या. रनिंग करण्याच्या नावाखाली ते पहाटे पाच वाजता फिरायला जात होते. त्यांच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होते. तिघांनी फ्री फायर गेम खेळणाऱ्या कोलकात्याच्या काही युवकांशी संपर्क साधला. त्यांनी नियोजन करून शनिवारी (ता. १३) मुंबईला जाण्याचे ठरवले. प्लाननुसार तिघेही शनिवारी पहाटे पाच वाजता एकमेकांना भेटले. तिघांनीही रेल्वस्टेशन गाठले. तेथून रेल्वे पकडून मुंबईला रवाना झाले.

सकाळ नऊ वाजेपर्यंत तिन्ही मुले बेपत्ता झाल्याचे आई-वडिलांना लक्षात आले. त्यांनी लगेच मुलांची शोधाशोध केली. मात्र, ते कुठेही मिळून आले नाही. काहींनी मॉर्निंग वॉक करताना दिसल्याचे सांगितले कुणी रेल्वे स्थानकाकडे गेल्याचे सांगितले. शोधाशोध केल्यानंतर पालकांनी प्रतापनगर पोलिस स्टेशन गाठले.

पोलिसांनी घेतली गंभीर्याने दखल

बेपत्ता मुलांचे पालक प्रतापनगर पोलिस ठाण्यात पोहोचले. कधी नव्हे ते आज त्यांनी गांभीर्यांने दखल घेतली. पोलिसांनी लगेच मुलांचा मोबाईल सीडीआर आणि मोबाईल लोकेशन काढले. त्याचे फोटो पोलिस ग्रुपवर टाकून शोधण्यासाठी प्रयत्न केले. तिन्ही मुले रेल्वेत असून तीन वाजता भुसावळपर्यंत होते. मुंबई पोलिसांना माहिती देऊन तिन्ही मुलांना ताब्यात घेण्याच्या सूचना नागपूर पोलिसांनी केल्याची माहिती आहे.

पब्जीप्रमाणे बंदीची मागणी

पब्जी मोबाईल गेमचे अनेकांना वेड लागले होते. अनेकांनी पब्जीमुळे आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्यात. त्यामुळे पब्जीगेमवर बंदी आणण्यात आली. त्याचप्रमाणे मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या फ्री फायर गेमवरही बंदी आणावी, अशी मागणी पालकवर्ग करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय म्हणालास रे... ये इकडे तुला...! किरॉन पोलार्डचा पारा चढला, पाकिस्तानी गोलंदाजाला दाखवली त्याची जागा

एक्स गर्लफ्रेंडला अमेरिकेत संपवलं, पोलिसात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली अन् तरुण भारतात परतला

Sangli Crime : चारित्र्याच्या संशयावरून युपीतून मिरजेत आणून पती-सासऱ्याने केला महिलेचा खून; कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, मिरजच का निवडलं?

Maharashtra Weather Update : विदर्भात थंडीची पाऊले परतीच्या वाटेवर! राज्यात कसं असेल तापमान?

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT