lungs  Sakal
नागपूर

अतिसूक्ष्म धुलीकणांचा फुप्फुसाला त्रास

फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण जिवावर बेतणारे ः ग्रीन क्रॅकर्सही फसवेच!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : फटाक्यांमुळे सुक्ष्म व अतिसूक्ष्म धुलीकण हवेत पसरतात. हेच कण श्वासाद्वारे फुप्फुसात शिरतात. या कणांमध्ये घातक रसायनासह ‘हेवी मेटल्स’ही असल्याने श्वसनाला त्रास होण्याबरोबरच फुप्फुसाला इजा होण्याची शक्यता आहे. ग्रीन क्रॅकर्स हे नाव गोंडस असले तरी हे फटाके प्रदूषणात केवळ ३० टक्के घट करीत असल्याने नागरिकांनी या फटाक्यांपासूनही लांब राहून प्रदूषणमुक्त दिवाळीवर भर देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दिवाळीनिमित्त घरांतील सर्वांचेच नियोजन सुरू आहे. त्यात बच्चे कंपनीकडून फटाके खरेदी करण्याचा आग्रह धरला जात आहे. पालकही त्यांचा हट्ट पुरविण्याच्या नादात प्रदूषणात भर घालण्याच्या तयारीत आहेत. परंतु, या फटाक्यांमुळे वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण जिवावर बेतण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वीच घोषित केलेल्या १२२ प्रदूषित शहरात नागपूरचा समावेश आहे. फटाक्यांमुळे शहरात सूक्ष्म व अतिसूक्ष्म धुलीकण वाढत असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ व ‘ग्रीन व्हिजिल फाउंडेशन’चे संस्थापक कौस्तव चॅटर्जी यांनी नमुद केले.

फटाक्यांमध्ये रसायनासोबतच हेवी मेटल्सचेही कण असतात. फटाके फुटल्यानंतर धुलीकणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. यामुळे अस्थमा, ब्रोंकायटीस तसेच श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांचा श्वास गुदमरतो. यात अनेकदा जिवावर बेतण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याशिवाय एलर्जीमुळे डोळ्यांना खाज, चर्मरोगाची लागणही होण्याची शक्यता असते. फटाक्यांतून कार्बन मोनोक्साईडमुळे रक्ताभिसरणालाही त्रास होतो. फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषणही वाढते. १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके फोडू नये, असे आदेश असला तरी त्याचे सर्रास उल्लंघन होते.

मोठ्या आवाजामुळे चिमुकल्यांच्या कानाला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय फटाके फोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. न फुटलेले फटाके कचऱ्याच्या माध्यमातून डम्पिंग यार्डपर्यंत जातात. हे फटाके अथवा त्यातील बारूद आगीच्या संपर्कात आल्यास डम्पिंग यार्डला आग लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या असल्याचे कौस्तव चॅटर्जी यांनी सांगितले.

फटाक्यांमधून निघणारे घातक रसायन

फटाक्यांमध्ये जिवाला धोका निर्माण करणारे अनेक रासायनिक घटक असते. यात कॅडानियम व शिसे हे सर्वात धोकादायक आहे. याशिवाय कॉपर, मॅगनिज, झिंक, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ऑक्साईड्स ऑफ सल्फर, फॉस्फोरस मोठ्या प्रमाणात बाहेर पडते. हे घटक सुक्ष्म धुलीकणातून नागरिकांच्या शरीरात प्रवेश करतात.

"फटाक्यामुळे वायूप्रदूषणासह ध्वनिप्रदूषणातही वाढ होते. त्यातही फटाके फोडण्यासाठी ८ ते १० ही वेळ निश्चित करण्यात आली. या दोन तासांमध्येच फटाके फुटल्यास सुक्ष्म धुलीकण मोठ्या प्रमाणात तयार होतील. त्यामुळे फटाक्यांचा वापर टाळणेच योग्य राहणार आहे."

- कौस्तव चॅटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

Pune News : महापौर बंगल्याच्या नामांतरावरून आजीमाजी महापौर आमनेसामने

SCROLL FOR NEXT