Today National mathematics day Learn math with the help of Qmath 
नागपूर

National mathematics day : क्यूमॅथच्या सहायाने गणित शिका हसत खेळत

राजेश रामपूरकर

नागपूर : लहान वयात खेळता खेळता गणित शिकवणे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे कमी वयातच या विषयाबद्दल उत्सुकता निर्माण करण्यासाठी आणि शिक्षणाचा भक्कम पाया करण्यासाठी मनन खुरमा यांनी क्यूमॅथ ही संकल्पना विकसित केली आहे. गणित विषय नेहमीच सोडवायला कठीण असल्याने विद्यार्थ्यांच्या आयुष्यात गणित कायम खलनायक! हा विषय क्यूमॅथच्या साहायाने सोप्या पद्धतीने शिकविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

लहान मुलांसाठी गणिताचे शिक्षण नव्या स्वरूपात देणे या उद्देशाने २०१३ मध्ये मनन खुरमा यांनी ‘क्यूमॅथ़’ सुरू केले. गणिताबद्दल सर्वसाधारणपणे असलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मॅथ, कोडिंग, डेटा आणि एआय अशी कौशल्ये मुलांना शिकवणे आणि त्यांना पुढच्या पिढीतील प्रॉब्लेम सॉल्व्हर बनवणे हे त्यांचे ध्येय आहे. सर्व समस्या सोडवण्याचे मूळ मॅथमध्ये आहे आणि मॅथ हा विषय रीझनिंगसोबत शिकला गेला नाही तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागते.

अंतर्ज्ञान म्हणजे शाळेत चांगले मार्क काढण्यासाठी गणितातील घातांक समजून घेणे नसते. तर या घातांकांची वाढ, त्यांचे नाट्यपूर्ण स्वरूप समजून घेणे आणि ‘कोविड-१९’ची समस्या सोडवण्याची गुरुकिल्लीही या घातांक वाढीला समजून घेण्यात आहे. या गरजा लक्षात घेऊन क्यूमॅथचा कार्यक्रम तयार केला आहे.

योग्य शिक्षण शोधणे आणि वर्गातील संख्या सुयोग्य ठेवण्यापासून ते प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षक वैयक्तिक लक्ष देऊ शकतील अशा पद्धतीने अभ्यासक्रम तयार करणे होय. या लाईव्ह सेशन्समध्ये सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शंका, प्रश्न प्रत्यक्ष वेळेत सोडवणे शक्य होते. अमेरिका, मध्य पूर्व आणि सिंगापूर अशा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पोहोचण्याच्या योजना कंपनीच्या आहेत.

ऑनलाइनवरील भर वाढणार

कोरोनाच्या परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणावरील भर वाढत जाणार आहे. भारतातील एड-टेक उद्योगाचे भविष्यही आश्वासक वाटत आहे. २०२५ पर्यंत ही बाजारपेठ सध्याच्या २.८ अब्ज डॉलर्सवरून १०.४ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा अंदाज मनन यांनी व्यक्त केला आहे.

मूळ तर्क समजून घेणे महत्त्वाचे

गणित म्हणजे तर्कशास्त्र, मेंटल मॉडेल्स तयार करणे, अल्गोरिदमिक विचार करणे आणि रीझनिंग. म्हणूनच गणित हा फक्त विषय नाही तर एक जीवनकौशल्य आहे. त्या पद्धतीनेच तो शिकवला जायला हवा. गणिताचे हे मूलभूत स्वरूप पाहता मुलामध्ये गणिताबद्दलचे अंतर्ज्ञान निर्माण व्हायला हवे. ‘मला गणित आवडत नाही’पासून ‘गणित सर्वोत्कृष्ट आहे’पर्यंतचा प्रवास सुकर करणे. मूळ तर्क समजून घेण्याचे महत्त्व पालकांना समजावून सांगण्यासाठी हे उपयोगी ठरणार असल्याचा मनन यांचा दावा आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT