Toll Tax Collection Despite Of 'Fasttag' 
नागपूर

तरीही... टोलनाक्‍यावर होतेय सक्तीची वसूली..

राजेश रामपूरकर

 
नागपूर : टोलनाक्‍यांवरच्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने फास्टटॅग यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र, काही टोलप्लाझावर चक्क कोरोनाचे नाव पुढे करत वाहनचालकांकडून डबलवसुली सुरू आहे. फास्टटॅग असतानादेखील मशीन काम करत नसल्याचे कारण देत रोख रक्कम घेतली जात आहे. वाहनचालकांच्या फास्टस्टॅगमधूनदेखील रक्कम वजा होत आहे. वाहनचालकांची दिशाभूल करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब वर्धा रोडवरील असोला येथील टोलनाक्‍यावर नुकतीच घडली. 

वर्धा रोडच्या असोला येथील टोलनाक्‍यावरून आठ दिवसांपूर्वी एक परिवार यवतमाळकडे निघाले. वाहनावर फास्टटॅग असल्याने निश्‍चितपणे ते नागपुरातून निघाले. मात्र, या टोलप्लाझावर गाडी थांबविण्यात आली. कोरोनामुळे फास्टटॅग प्रणालीमध्ये आपली नोंद झालेली नाही. त्यामुळे रोख रकमेची मागणी केली. प्रवाशांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि पुन्हा एकदा मशीन तपासा, असा सल्ला दिला. मात्र, गुंडप्रवृत्तीच्या तेथील व्यक्तींनी प्रवाशावर दडपण आणून गाडी काढण्यासाठी दम दिला. रोख रक्कमही वसूल केली. मात्र, थोड्याच वेळात आपल्या खात्यातून एसएमएस आला. त्यात रक्कम वजा झाल्याचे निदर्शनात आले.

त्यामुळे दुहेरी दंड संबंधिताला बसला. दुपारी चारला पुन्हा त्याच टोलनाक्‍यावरून नागपूरकडे निघाले. तेव्हा मात्र, सुस्थितीत फास्टटॅगच्या साहाय्याने वाहन बाहेर पडले. यावरून संबंधित कर्मचारी हे प्रवाशांची लूट करीत असल्याचे उघड झाले आहे. अशाप्रकारे अनेकांकडून रोखच रक्कम घेण्यात येत असावी, असा दावा प्रवाशांनी केला आहे. 

यासंदर्भात एनएचएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, दहा तारखेपासून नवीन टोळी या ठिकाणी रुजू केलेली आहे. तत्पूर्वीचा हा प्रकार असावा, तरीही यवतमाळ येथील कार्यालयात तक्रार करा, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

संपादन ः मेघराज मेश्राम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRPF exam controversy ८५ प्रश्न कॉपी पेस्ट! SRPF भरतीला स्थगिती, पोलीस उपमहानिरीक्षकांनी दिले चौकशीचे आदेश

DC vs CSK Live: चेन्नईच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, पण एक झेल सोडणे पडले महागात! त्रिस्तान स्तब्स-समीर रिझवीने झोडले...

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार प्रकरणी १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

Latest Marathi News Live Update : अजित डोवाल यांनी व्हिएतनामचे सरचिटणीस आणि राष्ट्रपती 'तो लाम' यांची घेतली भेट

Rohit Sharma च्या कमबॅकमागे दोन 'unsung heroes'! हिटमॅनने मानले आभार; जाणून घ्या कोण ते? एक आहे अभिनेत्रीचा पती अन्...

SCROLL FOR NEXT