Tourism business is well known! Who and how ... 
नागपूर

पर्यटन व्यवसायालाही घेतले विळख्यात! कोणी आणि कसे...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर :  चीनमधील कोरोना विषाणूच्या उद्रेकाचा परिणाम पर्यटनावरही होत आहे. यामुळे पर्यटनासाठी भारतात येणाऱ्या चीनमधील नागरिकांची संख्या कमी झाली आहे. तसेच भारतातून इतर देशांत जाणाऱ्या पर्यटकांची संख्येवरही परिणाम झाल्याचे जाणकारांकडून सांगितले जाते. कोरोना विषाणूची लागण आता युरोपातही होऊ लागल्याने अनेकांनी तिकडे जाण्याचे बेत रद्द केल्याची माहिती पुढे आली आहे.


दरवर्षी फेब्रुवारी ते मे कालावधीत चीनमधील हजारो पर्यटक भारतात पर्यटनासाठी येत असतात. या संख्येत घट झाली आहे. सध्या नागरिकांकडूनच आरक्षण रद्द केल्या जात आहे. चीनला जाणारी आणि तिथून येणाऱ्या विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर हॉंगकॉंग, मकाऊ, सिंगापूर, कंबोडियामधून भारतात येणाऱ्या पर्यटकांचीही कठोर तपासणी केली जात आहे. केवळ चीनमधूनच नव्हे, तर संपूर्ण आशियातून येणाऱ्या पर्यटकांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे दक्षिण पूर्व आशियातील पर्यटकांची संख्या घटली आहे. केवळ भारतात येणारे पर्यटकच नव्हे तर, भारतातून अन्य देशांमध्ये जाणाऱ्या पर्यटकांमध्येही "कोरोना'ची दहशत आहे. पाच ते सहा महिने अगोदर आरक्षण केलेल्या पर्यटकांकडून आरक्षण रद्द करण्यात येत आहे. ऐनवेळी आरक्षण रद्द केल्याने विमान कंपन्यांकडून पूर्ण रक्कम परत मिळत नसल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. एकूणच भारतातील पर्यटनावर यामुळे अधिक परिणाम झाला आहे.
याबद्दल नोवा ट्रॅव्हल्सचे संचालक मनविंदर तुली म्हणाले, विदर्भासह मध्यभारतातून मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंगापूर, मलेशिया, सिंगापूर आणि मकाऊ या देशात जातात. यातून मोठी उलाढाल होते. मात्र, गेल्या महिन्यापासून कोरोना विषाणूने जगात हैदोस घातला आहे. त्याचा फटका यादेशातील पर्यटनाला पहिल्या टप्प्यात बसला होता. आता युरोप पर्यटनालाही फटका बसू लागला आहे. अनेकांनी आपले टूर रद्द केलेले आहेत.
जॅक्‍सन ट्रॅव्हल्सचे संचालक सुनील काशिकर म्हणाले, दरवर्षी उन्हाळ्यात विदेशात जाणाऱ्यांची संख्या खूप असते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात बुकिंगही सुरू झाले होते. अचानकच कोरोना विषाणूचा उद्रेक वाढला आणि पर्यटनासह सर्वच व्यवसायाला फटका बसू लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

Dapoli Crime : जालगाव येथे जन्मदात्या आई-वडिलांवर मुलाचा कुऱ्हाडीने हल्ला; वडिलांच्या डोक्यावर व हातावर घाव

Pune News : महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख; प्रमाणपत्रासाठी १.०५ लाख अर्ज, यवतमाळ सर्वाधिक; पुण्यात ३,६८७ अर्ज

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

SCROLL FOR NEXT