Nitin Gadkari
Nitin Gadkari Sakal
नागपूर

नागपूर : ऑनलाइन नकाशा मंजुरीसाठी नगर रचना विभाग अनुत्सुक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दोन महिन्यांत (६० दिवस) इमारतीचा नकाशा मंजूर करणे बंधनकारक असताना नगर रचना विभागाकडून निकाली निघत नाही. अनेक वर्षे बांधकाम मंजुरीच्या फाइल प्रलंबित असल्याने नागरिक संतप्त आहेत. विशेष म्हणजे बिल्डरांची प्रकरणे रात्री उशिरापर्यंत कार्यालयात जागून पूर्ण केली जाते. ऑनलाइन नकाशा मंजुरीसाठी विभागातील अधिकारीच अनुत्सुक असल्याने सामान्यांची कामे होत नसल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन नकाशा मंजुरीचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिलेले आदेशही स्व कल्याणात आनंदी असलेल्या अधिकाऱ्यांनी धुडकावून लावल्याचे दिसून येत आहे.

शहराला शिस्तीसह आकार देण्याची जबाबदारी नगररचना विभागाकडे आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून नगररचना विभागाचा कारभार हा संशयाच्या गर्तेत सापडला आहे. महापालिकेच्या उत्पन्नात मोठी भर घालण्याची क्षमता असूनही केवळ स्वतःच्या लाभावरच लक्ष केंद्रित केल्याने हा विभागावर नेहमीच पदाधिकारीही नाराजी व्यक्त करीत आले. परंतु अधिकाऱ्यांच्या वागणुकीत किंचितही फरक पडला नाही. हा विभाग जेवढा ताकदवान तेवढाच भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेने बरबटलेला असल्याची चर्चा नेहमीच मनपा वर्तुळात रंगलेली दिसते. शहर विकास आराखडा असो की आरक्षणात बदल किंवा बांधकाम परवानगी, त्यात आरोप-प्रत्यारोप ठरलेले असतात. महापालिकेतील सर्व विभाग बंद झाल्यानंतर संध्याकाळी आणि रात्री उशिरापर्यंत नगररचना विभागाचा कारभार चालतो. रात्रीतच कोणाचे आरक्षण बदलले जाते, तर रातोरात कोणत्याही तपासणीशिवाय बांधकाम परवानगी दिली जाते. बिल्डर आणि या विभागातील अधिकाऱ्यांची एकी असून सर्वसामान्य माणूस हा नेहमीच नागवला जात असल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुंठेवारीच्या फाईली गायब होणे.

मनपाचे तत्कालिन आयुक्त अभिजित बांगर यांनी या विभागाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. नकाशाला ऑनलाइन मंजुरी देण्याची घोषणा केली होती. परंतु, ही घोषणा वल्गनाच ठरली. त्यानंतर आता महिनाभरापूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सामान्य माणसाची कामे त्वरित, पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी नगररचना विभागाने कार्यपद्धती डिजिटल करण्याचे निर्देश दिले होते. परंतु ऑनलाइन प्रणालीचा वापर केल्यास वेळेत नकाशा मंजुरी देणे बंधनकारक होणार असून यातून आर्थिक व्यवहारही प्रभावित होणार असल्याने या विभागातील अधिकाऱ्यांनी गडकरींचेही आदेश गुंडाळल्याचे चित्र आहे.

महापौर तिवारींही संतप्त

केंद्रीयमंत्री गडकरी यांनी घेतलेल्या बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी यांनी नगररचना विभागावर तीव्र संताप व्यक्त केला होता. या विभागात दलालांचे रॅकेट सक्रिय असल्याने सामान्य नागरिकांची प्रकरणे ८ ते ९ महिन्यांपर्यंत निकाली निघत नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. वीस वीस वर्षांपासून येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT