Transit Treatment Centers in All Districts 
नागपूर

अचूक नेम साधत वनमंत्र्यांनी भेदले लक्ष्य 

राजेश रामपूरकर


नागपूर,  : गावागांवांमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष चांगलाच वाढू लागला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अवनी नावाच्या वाघीणीला एका शिकऱ्यामार्फत ठार मारण्यात आल्याने चांगलाच वाद निर्माण झाला होता. हे लक्षात घेऊन संघर्षाच्या घटना घडत असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ट्रांझिट ट्रिटमेंट सुरू करण्याची घोषणा वनमंत्री संजय राठोड यांनी आज केली. यावेळी त्यांनी "ट्रॅन्क्‍युलायझेशन गन'ने सेंटरमध्ये सरावासाठी लावलेल्या लक्ष्याला अचूक भेदून शिकाऱ्यांना अप्रत्यक्षपणे इशाराच दिला. 

वनमंत्री राठोड यांनी वनविभागाच्या सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झीट ट्रिटमेंट सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी मानव व वन्यजीव संघर्ष वाढत असताना असे सेंटर वन्यजीवांसाठी आश्रयस्थान ठरु शकणार असल्याचे सांगत केंद्राच्या सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले. दरम्यान, वनमंत्री यांनी ट्रान्झीट ट्रिटमेंट सेंटरला नियमितपणे रोख किंवा वस्तूस्वरुपात भेट देणाऱ्या जागरुक नागरिकांचा प्रमाणपत्र देवून सन्मान केले. वन्यजीवांप्रती अशीच आत्मियतेची भावना सर्वांमध्ये निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी ट्रान्झीट ट्रिटमेंट सेंटरचे बचाव तुकडी, कंट्रोल रुम व श्वान पथकाच्या कार्याची माहिती घेतली. तसेच वन्यजीवांच्या उपचाराकरीता उपलब्ध सोई-सुविधा जसे एक्‍स-रे मशिन, ऑपरेशन थिएटर, पक्ष्यांकरीता उष्मायन आदींची पाहणी केली.

कोविडच्या कालावधीत केंद्राने केलेल्या परिश्रमाची दखल घेवून केंद्राला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी रामटेकचे आमदार डॉ. अशिष जयस्वाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) डॉ.एन. रामबाबू, प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के. राव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ठ वनोपज) टी. के. चौबे, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) पी. कल्याणकुमार, उपवनसंरक्षक डॉ. प्रभू नाथ शुक्‍ल, सहाय्यक वनसंरक्षक एस.बी. गिरी, सहाय्यक वनसंरक्षक एस. टी. काळे, व राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते उपस्थित होते. 

पंधराशे सापांचा वाचविला जीव 

गेल्या पाच वर्षात या ट्रान्झीट ट्रिटमेंट सेंटरमधून चार हजार पेक्षा अधिक वन्यप्राणी व पक्ष्यांचे बचाव, उपचार करुन नैसर्गिक अधिवासामध्ये सुटका केली आहे. सुमारे 1600 पेक्षा जास्त सापांना पकडून त्यांचा जीव वाचविला. नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या शंभरपेक्षा जास्त पक्ष्यांवर उपचार करुन त्यांना निसर्ग मुक्त करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT