नागपूर

नागपूरात उपनद्या नष्ट होण्याच्या मार्गावर!

कचरा, औद्योगिक प्रदूषणाने गटाराचे स्वरूप; संवर्धनाबाबत अनास्था

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मानवी संस्कृती नद्यांच्या काठावरच बहरली. परंतु मानवानेच नद्यांचे रूपांतर गटारात केले. नद्यांबाबत(rivers) केंद्र((central government) व राज्य सरकार(state government) सकारात्मक असले तरी उपनद्यांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. कचरा, औद्योगिक वसाहतीसह गावांतील सांडपाणीही आता उपनद्यांमध्ये सोडले जात असून त्या गटार झाल्या आहेत. उपनद्यांचे रूपांतर गटारात झाल्याने नद्यांचीही दुरवस्था झाली आहे. पुनरुज्जीवनाचे प्रयत्न होत नसल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

देशातील गंगा, गोदावरी, कृष्णा, कावेरी, यमुना आदी मोठ्या नद्यांना उपनद्यांची साथ आहे. उपनद्यांमुळे मोठ्या नद्या प्रवाहित आहेत. मात्र, या उपनद्या आपल्यासोबत सांडपाणी, कचरा आणि उद्योगांचे घाण पाणी वाहून नेत असल्याने मोठ्या नद्यांवर संकट आले आहे. शहरातील नाग नदी याचे मोठे उदाहरण असून शहरातील पिवळी व पोरा या उपनद्यांतील घाणीमुळे नाग नदीला कन्हान नदीला मिळण्यापूर्वी मोठ्या गटारगंगेचे स्वरूप आले आहे. त्यामुळे नाग नदीच्या सुमारे तीस गावांत आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उपनद्यातील घाणीमुळे मुख्य नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहाला मोठा अडथळा निर्माण झाला.

उपनद्यांतील घाणीमुळे जमिनीचा स्तर वाढत आहे तसेच पाण्याचा निचरा योग्य होत नसल्याने मोठ्या नद्यांना पाणी एकदम जाऊन मिळणे, त्यामुळे पावसाळ्यात अचानक पुराच्या घटना अलिकडे वाढल्या आहे. आता गावांकडेही सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तयार करण्यात आल्या आहेत. शहरे, गावातील प्रत्येक घरातील सांडपाणी, कचरा आणि औद्योगिक वसाहतीतील रासायनिक व घाण पाणी उपनद्यांमध्ये सोडल्या जात आहे. परिणामी अनेक उपनद्या आता नाल्यात परिवर्तित झाल्या असून त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. नाग नदी कन्हान नदीला मिळते. त्यामुळे कन्हान अंभोऱ्यापर्यंत दूषित पाणी घेऊनच पोहोचत आहे. हिंगण्यातील वेणा नदी सुद्धा विविध गावांचे सोडले जात असलेले सांडपाणी, कचरा आणि उद्योगांच्या घाण पाण्याने प्रदूषित झाली आहे. उपनद्यांचा प्रवाह स्वच्छ पाण्याचा राहिल्यास मोठ्या नद्या प्रदूषित होणार नाही. नागपूरसह हीच परिस्थिती विदर्भात, महाराष्ट्रात आणि देशात आहे. त्यामुळे प्रदूषणाने देशातील नद्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

सध्या अनेक उपनद्यांचे रूपांतर घाण पाण्यामुळे नाल्यात होत आहे. उपनद्या प्रदूषित होण्याचे मुख्य कारण घरातील सांडपाणी, कचरा आणि उद्योगांची घाण आहे. या उपनद्या असलेल्या गावांत सांडपाण्याचे योग्य नियोजन केल्यास नद्याही प्रदूषित होणार नाही. नागरिकांत जनजागृती आणि स्थानिक प्रशासनाचा विकासात्मक सहभाग महत्त्वाचा आहे. देशातील १०० टक्के उपनद्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

- शरद पालीवाल, नद्यांचे अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT