mundhe.
mundhe. 
नागपूर

तुकाराम मुंढेंची एकच फाईट, विरोध करणाऱ्यांचे वातावरण टाईट...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मनपातील सत्ताधारी पक्ष आणि मनपा आयुक्‍त यांचा कलगीतुरा कोरोनाच्या सावटातही रंगतो आहे. आयुक्‍त काम करीत नाहीत, केवळ स्टंटबाजी करतात, असा सरळ सरळ आरोप तुकाराम मुंढेंवर सातत्याने होतो आहे. मनपा आयुक्‍तांनी आज फेसबुक लाईव्ह करीत त्यांच्यावरील आरोपांचा खरपूस समाचार घेतला.
''स्टंटबाजी तुम्हाला करता येत असेल. ती माझ्या स्वभावात नाही. मला ऍक्‍शन घेता येते'', असे नमुद करीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज त्यांच्या विरोधकांना टोला हाणलाच, शिवाय इशारा दिला. ''कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेकांचे हित दुखावले गेल्याने मला हुकूमशहासारखी विशेषणे जोडली जात आहेत. आरोप करण्यापूर्वी हुकूमशाह म्हणजे काय? याचा अभ्यास करावा'', असा सल्लाही त्यांनी कुणाचेही नाव न घेता दिला.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अनेकांनी त्यांना प्रश्‍न विचारले. यात एकाने 'तुम्ही स्टंटबाजी करता, हुकूमशहासारखे वागता' अशी कमेंट' केली. हीच संधी साधत गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी व विरोधी पक्ष नेत्याने केलेल्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. गेल्या तीन महिन्यात कधी स्टंट केला? असा सवाल करीत आयुक्तांनी स्टंटबाजी केली असती तर कोरोनाबाबत केलेल्या उपाययोजनांतून जे चांगले परिणाम येत आहे, ते आले नसते, असे सांगितले. जनहितालाच प्राधान्य दिले, प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन स्वतः दुकाने बंद केली. केवळ कोरोनाच नव्हे तर स्वाईन फ्लूही यंदा आटोक्‍यात आहे. आतापर्यंत केवळ दोनच प्रकरणे पुढे आली. मागील वर्षी अडीचशे रुग्ण होते. ही माझी नव्हे तर आरोग्य विभागाची आकडेवारी आहे, असे ते म्हणाले. कायद्यानुसार कामे न करणारा हुकूमशहा असतो. मग मी हुकूमशहा कसा? व्यक्तिगत फायदा न पाहता लोकांचे हित जपणे हुकूमशाही आहे काय? असे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले. गेल्या अडीच महिन्यापासून लोकांना सामाजिक संस्थांकडून जेवण देत आहे. यासाठी शासनाने पैसे दिले. पण ते वापरले नाही. मी पूर्णपणे 'परफेक्‍ट' आहे, असा दावा नाही. पण 'परफेक्‍ट' काम करण्याचा प्रयत्न करतो. कठोर उपाययोजनांची गरज पडली तर तेही करेन, याला कुणी हुकूमशाही म्हणत असेल तर म्हणू द्या, असे ते म्हणाले. मी कधीही यशाचे श्रेय लाटले नाही. जे यश मिळत आहे, ते पोलिस, आशा वर्कर, जिल्हाधिकारी, पदाधिकारी, आरोग्य विभागाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आरोप-प्रत्यारोप करण्याची वेळ नाही
विलगीकरण केंद्रात उच्च दर्जाचे जेवण दिले. आणखी दर्जेदार अन्नासाठी राधास्वामी सत्संग मंडळाला विनंती केली. सकाळचा नाश्‍ता, दुपार, सायंकाळचे जेवण ते निःशुल्क देत आहेत. मी स्वतः जेवण केले. उत्तम दर्जाचे जेवण आहे. ही आरोप प्रत्यारोप करण्याची वेळ नाही, असेही ते म्हणाले. जेवणात अळ्या निघतात, हे अत्यंत चुकीचे आहे. पाणी सुद्धा कॅनचे दिले जाते, असेही त्यांनी नमुद केले.

सविस्तर वाचा - काय सांगता...! लॉकडाऊननंतर असं बदललं देहव्यापाराचं गणित
 
अन्‌ ट्रोलर्स गायब
आयुक्तांच्या संपूर्ण फेसबुक लाईव्हदरम्यान अनेकांनी त्यांच्या कार्यशैलीवर टिका केली. एकच कमेंट अनेकांनी केली. त्यामुळे एकूणच 'ट्रोल आर्मी' कार्यरत असल्याचे दिसून आले. मात्र, आयुक्तांनी 'स्टंटबाजी', हुकूमशाहीवरून आपली भूमिका स्पष्ट व सडेतोडपणे नमुद केली. त्यानंतर मात्र ट्रोलर्सने काढता पाय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT