tukaram mundhe
tukaram mundhe tukaram mundhe
नागपूर

तुकाराम मुंढे येणार अडचणीत; महापालिकेवर बरखास्तीची तलवार

राजेश प्रायकर

नागपूर : महापालिकेतील (Nagpur Municipal Corporation) स्टेशनरी घोटाळा तसेच आयुक्त असताना तुकराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या कार्यकाळात कोविड निधीची केलेली उधळपट्टी शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांनी विधानसभेत उपस्थित केली असून, याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी या घोटाळ्याची चौकशी करण्याची सूचना केल्याने महापालिका बरखास्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Sword of dismissal hanging over Municipal Corporation)

आमदार ठाकरे (Vikas Thackeray) यांनी तत्पूर्वी या घोटाळ्यामुळे महापालिका बरखास्त करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. २० वर्षांपूर्वी नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता असताना क्रीडा साहित्य घोटाळा उघडकीस आला होता. त्यामुळे अनेक नगरसेवकांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. या प्रकरणाच्या कोर्टकचेऱ्या आजही सुरू आहेत.

आता ६५ लाखांचा स्टेशनरी घोटाळा उघडकीस आला आहे. ही रक्कम फक्त आरोग्य विभागातील स्टेशनरीची आहे. जन्म-मृत्यू, स्थापत्य, सामान्य प्रशासन आदी विभागातही मोठ्या प्रमाणात स्टेशनरी खरेदी केली जाते. पुरवठादार मनोहर साकोरे याने ६७ लाख रुपये परत केले आहे. तसेच इतर विभागातील देयकांसाठी ५१ लाखांचे चार धनादेशसुद्धा जमा केले होते. यापैकी चारही धनादेश बाऊंस झाले आहेत. शहरातील महापालिकेच्या १० झोनमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात स्टेशनरी खरेदी केली जाते.

मनोहर साकोरे नावाच्या पुरवठादाराच्या वेगवेगळ्या नावाने एकूण सात फर्म आहेत. त्या माध्यमातून तो महापालिकेला स्टेशनरी पुरवठा करतो. तत्पूर्वी, तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) आयुक्त असताना कोरोनाच्या काळात कुठल्याही निविदा आणि कोटेशनशिवाय मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करण्यात आले होते. ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले पिंटू झलके यांनीसुद्धा कोविड निधीत अनियमितता झाली असून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

चौकशी करण्यासाठी समिती नेमावी

तत्कालीन आयुक्त मुंढे (Tukaram Mundhe) यांनी कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी कळमेश्वर रोडवरील राधा स्वामी सत्संग मंडळाच्या जागेत पाच हजार खाटांचे इस्पितळ उभारले होते. येथे शेड उभारून बेड, गाद्या, अंघोळीसाठी लागणारे साहित्य खरेदी केले होते. मात्र, दुसरी लाट आल्यानंतरही या इस्पितळाचा वापर केला नाही. येथील साहित्य कुठे गेले याचा अद्याप कोणालाच पत्ता नाही. या इस्पितळावर सुमारे आठ कोटींचा खर्च करण्यात आला होता. विशेष म्हणजे याच राधा स्वामी सत्संग मंडळाला मुंढे यांनी करोना रुग्णांच्या भोजनाचे कंत्राट दिले होते. कोरोनाकाळात रुग्ण आढळलेल्या अनेक वस्त्यांना बंद केले होते. कन्टोनमेंट झोन करण्यासाठी टीना खरेदी केल्या होत्या. त्यावर पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. हासुद्धा एक मोठा घोटाळा असल्याचे विकास ठाकरे यांनी विधानसभेत सर्वांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या सर्व घोटाळ्याची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी समिती नेमावी आणि महापालिका (Nagpur Municipal Corporation) बरखास्त करून भ्रष्टाचाराचे पाळेमुळे खणून काढावे अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT