Tur and Gram Dal sakal
नागपूर

Tur and Gram Dal : बाजारात ग्राहकांची वर्दळ मंदावली, व्यापाऱ्याची चिंता वाढली ;नऊ महिन्यांत ७० ते ८० रुपयांनी वाढले डाळीचे दर,साठेबाजीची शक्यता

केंद्र सरकारने तूर आणि चणा डाळीच्या साठवणुकीची मर्यादा सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे भाववाढीवर नियंत्रण येईल, असा कयास असताना बाजारातील ग्राहकांची वर्दळ कमी झाली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : केंद्र सरकारने तूर आणि चणा डाळीच्या साठवणुकीची मर्यादा सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे भाववाढीवर नियंत्रण येईल, असा कयास असताना बाजारातील ग्राहकांची वर्दळ कमी झाली. उलाढाल मंदावल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली. कारण निर्बंध लावल्यानंतरही तूर मूग, चणा आणि उडीद डाळींचे दर वाढतच आहे. गेल्या ९ महिन्यांत डाळीचे दर ७० ते ८० रुपये वाढले. महागाईत हे दर ‘जोर का झटका’ देत आहे. यामागे साठेबाजी आणि वातावरणात बदल हे महत्त्वाचे कारण मानले जाते.

मोठ्या व्यावसायिकांनी डाळीची साठवणूक केली. परिणामी, डाळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ठोक बाजारात जानेवारीत तूर डाळ १०० ते १०९ रुपये तर, चिल्लरमध्ये १७५ ते १८० रुपये प्रति किलो होती. आता घाऊक बाजारात १७० ते १७३ रुपयांवर पोहचली आहे. खाद्यतेलाच्या दरात किंचित वाढ झालेली आहे. मात्र, वाटाण्याचे दर अचानक प्रतिकिलो पाच रुपयांनी वाढलेले आहे.

तूर डाळीच्या शेतीवर पावसाळ्यात नुकसान झाले. शासन व प्रशासन डाळीची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरसावले आहे. साठेबाज हे कार्पोरेट क्षेत्रातील असल्याने त्यांच्यावरील कारवाईबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. हा आदेश घाऊक, किरकोळ विक्रेते, मिलर्स आणि कॉर्पोरेट क्षेत्रासाठी लागू आहे. डाळ मोठ्या प्रमाणात साठेबाजी करून कमतरता असल्याचे भासवले जात आहे. यामुळेच दर नियंत्रणाबाहेर वाढत आहे. जानेवारीपासून प्रत्येक महिन्यात डाळीचे भाव वाढत आहे. हे केंद्र सरकारच्या लक्षात आल्याने साठेबाजी करणाऱ्यांवरील निर्बंधात वाढ करण्यात आलेली आहे.

शेतकरी पेरणीत, पालक खरेदीत व्यस्त

धान्य बाजारात सध्या मंदीचे वातावरण आहे. शेतकरी पेरणीत गुंतला आहे. तर पालक पाल्यांच्या शालेय साहित्याच्या खरेदीत व्यस्त आहेत. त्यामुळे धान्य बाजारातील वर्दळ कमी झालेली आहे. केंद्र सरकारने डाळींवर निर्बंध लावलेले असले तरी दरात सणासुदीच्या तोंडावर वाढ होणार आहे. हे निश्चित आहे. दरम्यान, राज्यात विधानसभेच्या निवडणुका असल्याने राज्य सरकारलाही या भाववाढीविरोधातील जनतेच्या रोषाला तोंड द्यावे लागणार आहे.

शेतकरी शेतात, पालक पाल्यांच्या शालेय साहित्य खरेदीत व्यस्त असताना साठवणुकीवर निर्बंध आलेले आहे. बाजारातील चैतन्य गायब झाले असताना खरेदीही मंदावली आहे. परिणामी सर्वच धान्यांचे भाव स्थिरावले आहेत. यास्थितीमुळे मात्र, बाजारात अनिश्चिततेचा वातावरण निर्माण झाले आहे.

-प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर किरकोळ किराणा संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway : पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी! नांदेड आणि हरंगुळ एक्स्प्रेस गाड्या २६ जानेवारीपासून हडपसरवरून सुटणार, पहा नवीन वेळापत्रक

IPL 2026: राजस्थान रॉयल्सला मिळाली द्रविडची रिप्लेसमेंट! जडेजाला संघात घेतल्यानंतर जाहीर केला मोठा निर्णय

Latest Marathi Breaking News : बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT