नागपूर : ‘आता माझी जगण्याची इच्छा संपलेली आहे. मला मरायचे आहे. दहावीनंतरच माझ्या मनात आत्महत्येचा विचार येत होता. मात्र, मी आता जीव देत आहे.’, अशी सुसाईट नोट लिहून बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (student commits suicide) केली. ही घटना मानकापूर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. आदित्य मधुकर मोवाडे (१७, रा. साईनगर, गोधनी रोड) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. (Twelfth grade student commits suicide)
प्राप्त माहितीनुसार, आदित्य बारावीचा विद्यार्थी होता आणि जेईईची तयारी करीत होता. त्याचे आई-वडील खासगी संस्थेत काम करतात. मोठा भाऊ अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. आदित्यने राहत्या घरी खिडकीला दोरी बांधून गळफास लावला. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आई घरी परतली असता तो गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. मुलाला या अवस्थेत पाहून आईला धक्काच बसला. तिची आरडा-ओरड ऐकून शेजारी गोळा झाले.
आदित्यला तत्काळ खाली उतरवून खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, काही वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित (student commits suicide) केले. सुसाईड नोटवरून (wrote suicide note) त्याच्या मनात अनेक दिवसांपासून आत्महत्येचा विचार सुरू होता, असे दिसून येते. त्यामुळे तो कुठल्यातरी तणावात होता. मात्र, त्याचे कारण अद्याप होऊ शकले नाही. पोलिसांनी प्राथमिक तपासात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.
मोबाईलमध्ये लिहिली सुसाईड नोट
घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिस घटनास्थळावर पोहोचले. आदित्यजवळ पोलिसांना सुसाईड नोट (wrote suicide note) वगैरे काहीही मिळाले नाही. त्यामुळे त्याचा मोबाईल फोन तपासण्यात आला. आदित्यने आपल्या मोबाईलमध्येच सुसाईट नोट लिहून ठेवलेली होती. सुसाईट नोटमध्ये खिडकीला दोरी बांधणे आणि गळफास बनविण्याची वेळही त्याने नमूद केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.